Train Ticket Booking Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ganpati Special Trains: रेल्वेने 32 MEMU विशेष ट्रेनची केली घोषणा

2022 च्या गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे रोहा ते चिपळूण दरम्यान 32 मेमू गाड्या धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

2022 च्या गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे रोहा ते चिपळूण दरम्यान 32 मेमू गाड्या धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या 32 जादा गाड्यांमुळे 2022 मध्ये एकूण गणपती साठी विशेष गाड्यांची संख्या 198 होणार आहे. मेमू गणपती गाड्यांचे तपशील खालील प्रमाणे. (Ganpati Special Trains 2022 Latest News)

01157 मेमू 19.08.2022 ते 21.08.2022 पर्यंत रोहा येथून दररोज 11.05 वाजता सुटेल; 27.08.2022 ते 05.09.2022 आणि 10.09.2022 ते 12.09.2022 (16 सेवा) आणि त्याच दिवशी 13.20 वाजता चिपळूणला पोहोचणार.

01158 मेमू चिपळूण येथून 19.08.2022 ते 21.08.2022 पर्यंत दररोज 13.45 वाजता सुटेल; 27.08.2022 ते 05.09.2022 आणि 10.09.2022 ते 12.09.2022 (16 सेवा) आणि त्याच दिवशी 16.10 वाजता रोहा येथे पोहोचणार.

मुक्काम : आंबा, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड येथे असणार आहे.

सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या मेमू ट्रेनसाठी यूटीएस सिस्टमद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात असेही सांगण्यात आले आहे.

या मेमू ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा तसेच प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी COVID-19 नियम पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

MEMU चे भाडे असे असणार आहे:

रोहा ते माणगाव - 45 रु

रोहा ते वीर - 55 रु

रोहा ते करंजाडी - 65 रु

रोहा ते विन्हेरे - 65 रु

रोहा ते खेड - 80 रु

रोहा ते चिपळूण - 90 रु

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT