EMM Negative Blood Group: भारतात आढळला दुर्मिळ रक्त गट

भारतातील डॉक्टरांना एक दुर्मिळ रक्तगट आढळून आला आहे. EMM Negative असा हा दुर्मिळ रक्तगट आहे.
EMM Negative Blood Group
EMM Negative Blood GroupDainik Gomantak

साधारणपणे आपल्याला चार रक्तगट माहित आहेत. तर यामध्ये ए, बी, ओ आणि एबी असे चार रक्तगट सर्वांनाच परिचयाचे आहेत. मात्र, भारतातील डॉक्टरांना एक दुर्मिळ रक्तगट (Rare Blood Group) आढळून आला आहे आणि हा रक्तगट असणारी व्यक्ती ही भारतातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याची बाब आता समोर आली आहे. EMM Negative असा हा दुर्मिळ रक्तगट आहे. (EMM Negative Blood Group A rare blood group found in India)

EMM Negative Blood Group
Maharashtra: 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित!

गुजरातमधील (Gujarat) राजकोट येथे 65 वर्षीय व्यक्तीमध्ये हा दुर्मिळ रक्तगट आढळून आला आहे. समर्पण रक्तदान केंद्रातील डॉक्टर सन्मुख जोशी यांनी सांगितले आहे की, या 65 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथे हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रक्ताची गरज होती. मात्र, अहमदाबाद मध्ये त्यांच्या रक्तगटाशी मिळते जुळते रक्तगट उपलब्ध झाले नाही. त्यानंतर सुरत येथील रक्तपेढीत त्यांच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली आहे.

EMM Negative Blood Group
द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्यावर शिवसेनेने सोडले मौन

या रक्तगटाची चाचणी केल्यानंतर हे रक्त कोणत्याही रक्तगटाशी मिळते जुळत नव्हते. त्यानंतर या व्यक्तींच्या नातेवाईकांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी अमेरिकेमध्ये पाठवले आणि त्यावेळी त्यांचा रक्त गट दुर्मिळ असल्याची बाब समोर आली आहे. भारतातील हा पहिलाच रक्तगट असून जगातील दहावी व्यक्ती असल्याचेही समोर आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com