ganpati festival booking starts from 1st august for konkan st bus msrtc to run 4300 extra buses Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ganpati Festival: लालपरी सज्ज! गणेशोत्सवासाठी कोकणात बिनधास्त जा; एसटीने घेतला 4,300 ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय

Ganpati Festival: कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच माहोल पाहायला मिळतो. गणेशोत्सव आणि शिमगा या दोन सणांना कोकणात विशेष महत्त्व आहे.

Manish Jadhav

ganpati festival booking starts from 1st august for konkan st bus msrtc

कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच माहोल पाहायला मिळतो. गणेशोत्सव आणि शिमगा या दोन सणांना कोकणात विशेष महत्त्व आहे. यंदाच्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. बप्पाच्या स्वागतसाठी आता कोकण रेल्वेसह एसटी महामंडळही सज्ज झाले आहे.

कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. याच पाश्वभूमीवर एसटी महामंडळाने आता यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत रिझर्व्हेशनसह गट रिझर्व्हेशनमध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 50 तिकीट दरामध्ये सवलत देण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून 2 सप्टेंबरपासून ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 3500 ज्यादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये तब्बल 800 बसेस वाढण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

यंदा तब्बल 4300 ज्यादा बसेस धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या असून सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे.

एसटी महामंडळाच्या या मोठ्या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. याआधीच कोकणात जाणाऱ्यांसाठी 202 स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. लाखो चाकरमान्यांची होणारी परवड लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला.

दरवर्षी मुंबईतून (Mumbai) हजारो चाकरमाने कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. या काळात बस किंवा ट्रेनचे तिकीट मिळत नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. रेल्वे मंत्रायलाच्या या निर्णयानंतर एसटी महामंडळानेही सुमारे 4300 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची परवड होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT