OBC Reservation Dainik Gomantak
महाराष्ट्र

OBC आरक्षणावरुन फडणवीस अन् भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक

ओबीसी आरक्षणावरून एकमेकांवरती चिखलफेक करण्याऐवजी एकत्र बसून आपण या समस्याचा तोडगा काढावा.

दैनिक गोमन्तक

ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) एकमेकांवरती चिखलफेक करण्याऐवजी एकत्र बसून आपण या समस्याचा तोडगा काढावा. ओबीसीबाबतीत सर्व पक्षातील लोकं एक मताने दिसून आले आहेत. हे आपण देशाला दाखवून देऊया. ओबीसी समाज वाचावा ही सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका आहे. आरोप-प्रत्यारोप, राजकारण होत राहिल परंतु याने हा प्रश्न सुटणार का? कायदेशीर बाबी तपासून हा प्रश्न सोडवूयात. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केलं आहे. (OBC Reservation)

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 2010 मध्ये ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तर हा डेटा 2016 मध्ये समोर आला आहे. परंतु केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना गेली 7 वर्ष तुम्ही गप्प का आहात? ओबीसी आरक्षणाबाबत भाजप राजकारण करत आहे आणि ही चुकीची गोष्ट आहे. युपीए सरकारने तयार केलेला डेटा तुम्ही पुढे का आणला नाही? निवडणुका आल्यानंतर यावर राजकारण केले जात आहे. ओबीसी आरक्षणाची जबाबदारी मोदी सरकारवर (Modi government) वरती आहे असं त्यांनी सांगितले.

त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भुजबळांना प्रत्युत्तर दिले. ओबीसी आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही बैठकीला येऊ. परंतु बैठकीत जे ठरवलं जातं ते पुढे का जात नाही किंवा होत नाही? वैयक्तिक तुमचाचं आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु मंत्री म्हणून तुम्हाला सरकारचा पाठिंबा आहे का? मग सरकार ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतंय का? ओबीसी आरक्षणावरून आमच्याकडे बोट दाखवू नका.

ओबीसी आरक्षणाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळला आहे, ही जबाबदारी राज्य सरकारला घ्यावीच लागेल. ओबीसी आरक्षणाबाबत केवळ आश्वासनं मिळतात त्यावर काहीच होत नाही. त्यामुळे सभागृहात ओबीसी आरक्षणावर चर्चा व्हायला हवी अशी मागणी फडणवीसांनी दिली आहे. दरम्यान, ओबीसींचे राजकीय आरक्षण सरकारच्या अपयशामुळे पूर्णपणे संपलेले आहे. राजकीय मागासलेला पणाचा उल्लेख या अहवालात कुठेच नव्हता. कोर्टात नवीन कुठलीही माहिती आणि रिसर्च करून डेटा पुरवला नाहीये असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत उडाला गोंधळ

ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळ आमनेसामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. विधानसभा सभागृह सुरू होताच विरोधकांनी OBC आरक्षणावरून गदारोळ सुरू केला, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रत्युत्तर देत ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्यासाठी भाजपा आणि मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून सभागृहात गोंधळ उडाला. आणि मग विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT