काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी (ganesh utsav) सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. कोकणात (Konkan) गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह पहायला मिळतो. कामानिमित्त बाहेर राहणारे लाखो कोकणवासीय गणेश भक्त अनेक ठिकाणावरून कोकणात दाखल होत असतात. या गणेश भक्तांच्या प्रवासासाठी 'मोदी एक्स्प्रेस'ची घोषणा ( Modi Express ) आमदार नीतेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी केली आहे. दादर ते कणकवली दरम्यान ही मोफत ट्रेन असेल.
सलग दुसऱ्या वर्षी ही 'मोदी एक्सप्रेस' कोकणात जाणार आहे. प्रवासादरम्यान एक वेळचे जेवण व त्यासोबत आरतीचे पुस्तक ही दिले जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.
नितेश राणे काय म्हणाले ?
"काय मग गाववाल्यांनो गणपतीत गावाक जायचे की नाही? मग चला तयारीला लागा. यावर्षीही तुमच्यासाठी 'मोदी एक्सप्रेस' आणतोय. गेल्या दहा वर्षांपासून बसेस सोडण्यात आल्या व मागच्या वर्षापासून मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडत आहे. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दादर प्लॅटफॉर्म नंबर 08 वरून तुमच्या हक्काची मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडणार आहे. ही ट्रेन दादरपासून कणकवली पर्यंत जाणार आहे. वैभववाडी इथे थांबणार आहे."
"या दरम्यान एक वेळचे जेवण व आरतीचे पुस्तक देण्यात येणार आहे. सर्व तयारी झाली आहे. तुम्हाला बुकिंगसाठी दरवर्षीप्रमाणे माझ्या भाजपच्या मंडळ, तालुका अध्यक्षांना फोन करायचा आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी इथल्या मंडल व तालुकाध्यक्षांना फोन करा व तुमची बुकिंग करा. चला मग भेटू 29 तारखेला. गणपती बाप्पा मोरया!" असे नितेश राणे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.