CM Pramod Sawant यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

राज्यातील अनेक मुद्यांवर केली चर्चा
Pramod Sawant met Prime Minister Narendra Modi
Pramod Sawant met Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट नवी दिल्ली येथे घेतली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी नेमकी काय चर्चा झाली यावर स्पष्टता दिली नसली तरी गोव्यातील अनेक मुद्यावर आपण पंतप्रधानांशी चर्चा केली असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Pramod Sawant met Prime Minister Narendra Modi
संघटीत कार्यावरच यश अवलंबून- डॉ. चंद्रकांत शेट्ये

याबाबत बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे की पंतप्रधानांचे मार्गदर्शन आणि पाठबळ गोव्यातील लोकांसाठी काम करण्याची क्षमता वाढवते. त्यामूळे आमच्यासाठी पंतप्रधानांन भेटणे म्हणजे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणखी उर्जा मिळणे असे असल्यांच ते यावेळी म्हणाले.

Pramod Sawant met Prime Minister Narendra Modi
Valpoi News: श्री हनुमान विद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांना साईकल प्रदान

या भेटीदरम्यान काय चर्चा झाली याबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासोबत NITI आयोगाची आज बैठक पार पडली.

केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनेमूळे गोव्यात पीक विविधता, तेलबिया आणि कडधान्ये यांना प्रोत्साहन दिले. यामूळेच गोवेकर डाळी आणि तेलबियांच्या प्रचारात गुंतले आहेत. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाला पुढे नेत आम्ही स्वयंपूर्ण गोवा अभियान सुरू केले आहे. असे ही सावंत यावेळी म्हणाले.

पंतप्रधान गोव्याला दिलेल्या प्रेरणेमुळे प्रत्येक स्वयंपूर्ण मित्र, ग्रामपंचायत, पंच, सरपंच, कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय, गोव्यातील सर्व शेतकरी जोडलेले आहेत. आणि तेव्हापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी हे काम पुढे नेले आहे. आत्तापर्यंत आपले सर्व शेतकरी प्रत्येक गावात स्वावलंबी होण्यासाठी चांगले काम करत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020)

गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्याचे काम सुरू आहे. गोवा सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. कोकणी भाषेतील अभ्यासक्रमही ठरविण्यात आला आहे. गुजरातप्रमाणे गोव्यातही विद्या समीक्षा केंद्र सुरू होत आहेत. सर्व शाळांमध्ये वैदिक नियोजन पूर्ण झाले आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संवेदनशील करणे. गोवा सरकार पायाभूत सुविधाही पूर्ण करत आहे.

पुढील वर्षापासून गोवा सरकार एनईपी अधिक सखोलपणे लागू करू शकेल असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले तसेच गोवा सरकार कोडिंग आणि रोबोटिक्सचे शिक्षण सुरू केले आहे. या वर्षात आम्ही गोव्यातील प्रत्येक शाळेत मोफत कोडिंग उपकरणे प्रत्येक शाळेत देत आहोत.

गोवा सरकारला NEP 2020 उच्च शिक्षणातील अंमलबजावणीसाठी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना संवेदनशील करत आहे. गोवा सरकार कॉलेज ते विद्यापीठ स्तरावर अंमलबजावणी करत आहे. तालुकानिहाय संस्था ओळखून एनईपी लागू करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. पुढील वर्षी उच्च संस्थांमध्ये 100 % NEP लागू केले जाईल. असे ही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com