Pune To Sindhudurg Direct Flight Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune Sindhudurg Flight: पुण्यातून दीड तासांत सिंधुदुर्गला जाता येणार; गोव्याच्या कंपनीकडून आठवड्याचे 5 दिवस विमानसेवा सुरु

Pune To Sindhudurg Direct Flight: गोव्याच्या फ्लाय - ९१ कंपनीने सिंधुदुर्ग ते पुणे अशी थेट विमानसेवा सुरु केली आहे.

Pramod Yadav

Pune Sindhudurg Flight

सिंधुदुर्ग ते पुणे थेट विमानसेवा पुन्हा सुरु झाली आहे. गोव्यातील फ्लाय - ९१ या कंपनीने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विमानसेवा सुरु केली आहे. आठवड्याचे पाच दिवस ही विमानसेवा सुरु असेल. यामुळे प्रवाशांना अवघ्या दीड तासांत पुण्यातून सिंधुदुर्ग गाठता येणार आहे. या विमानसेवेचा पर्यटकांना मोठा लाभ होणार आहे.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते पुणे विमानतळ सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्याचे पाच दिवस विमानसेवा सुरु राहणार आहे. फ्लाय - ९१ या कंपनीने कंपनीच्या संकेतस्थळावरुन फ्लाईट बुकिंगला सुरुवात केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही विमानसेवा बंद करण्यात आली होती. अखेर दोन महिन्यानंतर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे.

विमानभाडं किती?

सिंधुदुर्ग - पुणे विमानाने प्रवास करण्यासाठी तुम्हाला २,९४१ रुपये मोजावे लागतील. यात विविध कर वाढण्याची शक्यता आहे. नमूद करण्यात आलेला दर कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. फ्लाईटचे वेळापत्रक, विमानभाडे याच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Pune Sindhudurg Flight Ticket

मंगळवारी (०१ एप्रिल) पासून फ्लाय - ९१ कंपनीने सिंधुदुर्ग - पुणे - सिंधुदुर्ग विमानसेवा सुरु करण्यात आली. पुण्यातून सकाळी ७.५० वाजता सुटलेले विमान सकाळी ९.१० वा सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल झाले. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रवाशांना लाभ होणार आहे. कंपनीने लवकरच मुंबई ते सिंधुदुर्ग देखील विमानसेवा लवकरच सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

गोव्यात येण्यासाठीही पडणार जवळ

गोव्यात येण्यासाठी फ्लाईट चुकल्यास अथवा विमानभाडे परवडत नसल्यास पर्यटकांना चिपी विमानतळावरुन गोव्यात येणे सोप्पं होणार आहे. शिवाय सिंधुदुर्गसह गोव्यातील पर्यटनासाठी आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT