Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

अमरावतीमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ठार झालेले लोक एका लग्न समारंभासाठी जात होते.

दैनिक गोमन्तक

अमरावती : अमरावती जिल्ह्यात (Amravati) मोठा भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ठार झालेले लोक एका लग्न समारंभासाठी जात होते.

नांदगावपेठ-देवलगाव रिंगरोडवर झालेली धडक एवढी भीषण होती की, कारचे पूर्ण नुकसान झाले आणि ट्रकची पुढील दोन चाकेही निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. अंजनगाव सुर्जी गावातील रहिवासी असलेले हे कुटुंब एका लग्न समारंभासाठी वालगावमार्गे नांदगावपेठ येथे जात होते. या दरम्यान कारचा जोरदार अपघात झाला.

नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही कार पोटे कॉलेजजवळ आली तेव्हा चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकला धडक दिली. यानंतर विद्युत खांब तोडून ट्रक रस्त्याच्या पलीकडे गेला.

या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जवळपास काम करणारे काही कामगार अपघात स्थळी पोहोचले आणि कारमधून वाचलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक अपघातस्थळावरून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT