Chagan Bhujbal Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मालिकांच्या पाठीशी

राजीनामा घेणार नाही, उद्या महाविकास आघाडीचे सर्व मंत्री ईडीच्या कारवाईविरोधात मुंबईतील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

नवाब मलिक यांना आज सकाळी ईडी ने अटक केली आहे. नवाब मलिक यांना जामीन मिळनार की कोठडी मिळणार या संदर्भातील कोर्टाचा निर्णय अजून यायचा आहे. मात्र महाविकास आघाडीने नवाब मलिक यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहेय त्यांच्या या भूमिकेला काँग्रेस व शिवसेनेनेही समर्थन दिले आहे. उद्या महाविकास आघाडीचे सर्व मंत्री ईडीच्या कारवाईविरोधात मुंबईतील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहेत.

भुजबळ पुढे म्हणाले की, पहाटे नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले, आणि त्यांना घेऊन ते सकाळी सहा वाजता ईडीच्या आॅफिसमध्ये घेऊन गेले, ही दुर्देवाची गोष्ट आहे. यानंतर तिथे त्यांची चौकशी करुन त्यांना कोर्टात घेऊन गेले. सन 1992 सालच्या घटना तसेच सन 1999 सालच्या जागेचा करार आणि त्यानंतर बारा वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला.

तत्पूर्वी या घटनांमध्ये अनेकांवर कारवाया झाल्या पण यामध्ये नवाब मलिकांचं नाव कुठेही आलं नव्हतं. मग आत्ताच त्यांच्यावर कारवाई का केली जाते. तर नवाब मलिक हे सातत्यानं भाजपाच्या चुकीच्या कारवायांविरोधात बोलत आहेत. भाजपकडून कसा अन्याय होतोय हे सांगत आहेत. त्यामुळं त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. एकेका मंत्र्याला अडकवून त्यांना राजीनामा द्यायला लावायचा, हा आनंद आम्ही विरोधी पक्षाला मिळू देणार नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT