Shaktipeeth Highway Protest Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार! मुंबईतील आझाद मैदानावर 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटले

Shaktipeeth Highway Protest: शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोणतीही मागणी नसताना हा महामार्ग प्रकल्प आमच्यावर लादला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Manish Jadhav

Farmers Protest Against Shaktipeeth Expressway Azad Maidan Mumbai

शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोणतीही मागणी नसताना हा महामार्ग प्रकल्प आमच्यावर लादला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात गुरुवारी (12 मार्च) मुंबईतील आझाद मैदानावर हजारो संख्येने शेतकरी एकवटले.

आझाद मैदानावर शेतकरी एकवटले

शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधानसभेवर शेतकरी चालून जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आझाद मैदानावरील आंदोलनासाठी सांगली, कोल्हापूरसह तब्बल 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षातील नेतेही आझाद मैदानावर पोहोचू लागले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे देखील सांगितले. तर दुसरीकडे, आझाद मैदानात एकवटलेल्या शेतकऱ्यांना (Farmer) आंबादास दानवे, आमदार सतेज पाटील, जयंत पाटील यांनी संबोधित केले.

''सरकार तुमच्या मनाविरोधात काम करणार नाही...''

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्तीपीठ महामार्गावर बदलेल्या भूमिकेवर शरसंधान साधले. शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला नसेल तर सरकार (Government) तुमच्या मनाविरोधात काम करणार नाही, असे एकुनाथ शिंदे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ दानवे यांनी शेतकऱ्यांना दाखवला. या सरकारचे कंत्राटदारांशी लागेबांधे असल्याचे ते यावेळी म्हणाले. जनतेच्या मनाविरोधात शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रेटण्याचा हा सरकारचा डाव असल्याचे देखील ते पुढे बोलताना म्हणाले.

सतेज पाटील आक्रमक

शक्तीपीठ महामार्गावर बोलताना सतेज पाटील यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी सरकारच्या बदललेल्या भूमिकेवर कडाडून प्रहार केला. लोकसभेचा निकाल लागला तेव्हा शेतकऱ्यांचा राग निवळला असा भ्रम सरकारने निर्माण केला. एवढचं नाहीतर कोल्हापूरपर्यंतचा रस्ता तयार झाल्याचा भ्रमही त्यांच्याकडून करण्यात आला. पाटील पुढे म्हणाले की, 86 हजार वसूल करण्यासाठी तब्बल 28 वर्षे लागतील. शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा करण्यासाठी त्या मार्गातील मंदिरांना तब्बल 3 कोटी द्या. म्हणजे, तिथे देशभरातून येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा देता येतील. जे गरजेचे आहे त्याला शेतकऱ्यांचा बिलकुल विरोध नाही. मात्र हा महामार्ग गरजेचा नसल्यामुळे शेतकरी विरोध करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

SCROLL FOR NEXT