PM Narendra Modi
PM Narendra Modi  ANI
महाराष्ट्र

PM Modi: मोदींच्या मुंबईतील सभेतून तोतया NSG जवानाला अटक; आर्मी, आयबीकडून चौकशी सुरू

गोमंतक ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबईत होते. येथे त्यांनी सुमारे 38,800 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती एनएसजीचे बनावट ओळखपत्र दाखवून एमएमआरडीए मैदानावर आयोजित पंतप्रधानांच्या कार्यक्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात काही मोठा कट रचला गेला होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी रामेश्वर मिश्रा (35) हा नवी मुंबईचा रहिवासी आहे. तो भारतीय लष्कराच्या गार्ड्स रेजिमेंटचा सैनिक असल्याचा दावा करत आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संशयित व्यक्ती व्हीव्हीआयपी विभागात जाण्याचा प्रयत्न का करत होता? याबाबत आर्मी, आयबी, दिल्ली पोलीस आणि पीएम सुरक्षा अधिकारी अशा अनेक एजन्सी संशयिताच्या माहितीची चौकशी करत आहेत.

दरम्यान, मुंबईत पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 4,500 पोलीस तैनात करण्यात आले होते. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या चार प्लाटून आणि जलद कृती दलाचे दंगलविरोधी पथक त्यांच्या कार्यक्रमात तैनात करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या आगमनासाठी मुंबईतील वांद्रे कुर्ला परिसर आणि आसपासचा परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला होता. तसेच, काही रस्त्यांवर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती.

पीएम मोदींच्या सभेच्या ठिकाणी गस्त घालत असताना पोलिसांना त्यांच्यावर संशय आला आणि त्याला पकडण्यात आले. हा व्यक्ती सुरूवातीला इकडे तिकडे फिरत होता. त्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवले. अर्धा तास त्याच्यावर नजर ठेवल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडून चौकशी सुरू केली.

13 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या एलिट नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (एनएसजी) बनावट आयडी त्याच्याकडे सापडले आहे. त्यात रेंजर म्हणून त्याच्या पोस्टिंगचा उल्लेख आहे. पण आयडीच्या रिबनवर दिल्ली पोलिस सुरक्षा (पीएम) लिहिलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT