Jammu Kashmir Blast: 'भारत जोडो यात्रे'दरम्यान जम्मूत दोन दहशतवादी बॉम्बस्फोट, अनेक लोक जखमी

Jammu Kashmir Blast News: जम्मूच्या नरवाल भागात सलग दोन दहशतवादी स्फोट झाले आहेत. लष्कराने या स्फोटांना दुजोरा दिला आहे.
Jammu Kashmir Blast
Jammu Kashmir BlastDainik Gomantak

Jammu Kashmir Blast News: जम्मूच्या नरवाल भागात सलग दोन दहशतवादी स्फोट झाले आहेत. लष्कराने या स्फोटांना दुजोरा दिला आहे. हे स्फोट ट्रान्सपोर्ट नगरमध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटांमध्ये सात जण जखमी झाले आहेत.

लष्कराने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु केली आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा जम्मूमधून जात असताना हे स्फोट झाले. काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी राहुल गांधींना यात्रेदरम्यान न फिरण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरिंदर भाटियाली म्हणाले की, 'स्फोटात जखमी झालेल्या सात जणांवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. त्यापैकी एकावर शस्त्रक्रिया सुरु आहे.' तत्पूर्वी, अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश सिंह म्हणाले की, "नरवाल येथे झालेल्या दुहेरी स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत."

Jammu Kashmir Blast
Jammu And Kashmir: दोन दिवसांत 6 हिंदूंची हत्या, लहान मुलांनाही दहशतवाद्यांकडून केलं जातयं लक्ष्य

दुसरीकडे, ज्या भागात दहशतवादी (Terrorist) स्फोट झाले ते व्यावसायिक क्रियाकलापांचे केंद्र आहे. ट्रान्सपोर्ट नगरच्या यार्ड क्रमांक 7 मध्ये दोन वाहनांमध्ये स्फोट झाल्याची माहिती मुकेश सिंह यांनी दिली आहे. आम्ही स्फोटांचे स्वरुप तपासत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी, 28 डिसेंबर रोजी पाकिस्तानातून घुसखोरी करुन ट्रकमधून काश्मीरला जाणारे चार सशस्त्र दहशतवादी नरवालपासून 11 किमी अंतरावर असलेल्या सिध्रा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाले होते. जम्मू भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.

जम्मूमध्ये भारत जोडो यात्रा सुरु आहे

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पाच दिवस अगोदर हाय अलर्ट असताना हा स्फोट झाला आहे. सध्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मूमधून जात आहे.

Jammu Kashmir Blast
Firing in Jammu & Kashmir: काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू; 10 जखमी

प्लॅननुसार, राहुल गांधींची यात्रा 19 जानेवारीला लखनपूरला पोहोचली होती. तिथे एक रात्र थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कठुआच्या हटली मोड येथून निघाली. 21 जानेवारीला सकाळी हिरानगर ते दुग्गर हवेली असा प्रवास सुरु झाला आणि 22 जानेवारीला विजयपूर ते सटवारीपर्यंत जाईल.

अलीकडेच, सुरक्षा यंत्रणांनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान न फिरण्याचा सल्ला दिला होता. राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे इनपुट मिळाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com