India-Pakistan Ralations: मेहबूबा मुफ्ती भारताच्या 'कट्टर शत्रू' ची वकिली का करतात? मोठे कारण आले समोर

India-Pakistan Dialogue: शेजारी देश असल्याने आपण स्वातंत्र्यापासून पाकिस्तानच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत. विशेष म्हणजे, तो पाकिस्तानच्या घोषित धोरणाचा भाग आहे.
Mehbooba Mufti
Mehbooba Mufti Dainik Gomantak
Published on
Updated on

Mehbooba Mufti's Statement: एक भारतीय नागरिक म्हणून, पाकिस्तानचे नाव घेतल्यावर तुमच्या मनात पहिली प्रतिमा कोणती उभी राहते. दहशतवाद आणि पाकिस्तानात सुरु असलेल्या असंख्य दहशतवादी छावण्यांबाबत सर्वांना माहिती आहे. कारण शेजारी देश असल्याने आपण स्वातंत्र्यापासून पाकिस्तानच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत. विशेष म्हणजे, तो पाकिस्तानच्या घोषित धोरणाचा एक भाग आहे.

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तीन मोठी युद्धे झाली आहेत. 1999 मध्ये झालेल्या कारगिलच्या भीषण युद्धाच्या आठवणीही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. म्हणूनच जेव्हा-जेव्हा पाकिस्तानसोबत शांतता आणि व्यापाराची चर्चा होते, तेव्हा 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याची स्मृती सर्वसामान्य भारतीयांच्या मनात तरळू लागतात.

भारत पाकिस्तानवर कसा विश्वास ठेवणार?

पाकिस्तानच्या (Pakistan) या धोरणामुळे भारत पाकिस्तानवर विश्वास ठेवण्याची हिंमत कधीच दाखवू शकत नाही. पण आज भारतात मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला यांच्यासारखे अनेक नेते आहेत, ज्यांच्या मनात फक्त आणि फक्त पाकिस्तानचाच विचार वसतो. पाकिस्तानच्या PR टीमचा एक भाग असल्याप्रमाणे ते पाकिस्तानशी चर्चा करण्याची वकिली करतात.

Mehbooba Mufti
Mehbooba Mufti slams BJP: गांधी-नेहरूंचा देश, भाजपचा होऊ देणार नाही!

शहाबाज शरीफ यांच्याकडे शांतिदूत म्हणून पाहिले जाते!

मेहबुबा या भारताच्या नागरिक आहेत, सर्वसामान्य भारतीयांच्या करातून जमा झालेल्या पैशातून त्यांना अनेक सुविधा मिळतात. मात्र असे असूनही त्यांना भारतापेक्षा पाकिस्तानचीच जास्त चिंता आहे. म्हणूनच त्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना शांतिदूत म्हणून पाहतात. ज्या पाकिस्तानचा खरा अजेंडा भारताचा नाश करणे आणि हजारो कटांसह भारतात रक्तपात घडवून आणणे आहे.

Mehbooba Mufti
Mehbooba Mufti: 'इतक्या टोकाला जातील...', BJP चा मेहबुबा मुफ्तींवर हल्लाबोल

पाकिस्तानशी संवाद का माधुर्य आहे?

मेहबुबा मुफ्तीच नाही तर जम्मू-काश्मीरचे आणखी एक माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे देखील पाकिस्तानशी चर्चेची वारंवार मागणी करतात. जेव्हा मेहबुबा मुफ्ती शाहबाज शरीफ यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करतात, तेव्हा अब्दुल्ला का मागे राहतील?

खरे तर, पाकिस्तानचे पंतप्रधान शरबाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी अल अरेबिया वाहिनीला मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी कबूल केले होते की, 'पाकिस्तानने भारतासोबत तीन युद्धे केली आणि या युद्धांतून त्यांना विनाशाशिवाय काहीही मिळाले नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com