Eknath Shinde & Ashok Chavan Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ashok Chavan : खळबळजनक! 'या' मंत्र्यांचा घातपात घडवून आणण्याचा होतोय प्रयत्न? मुख्यमंत्रांनी दिले चौकशीचे आदेश

माझा मेटे करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारच चव्हाण यांनी नांदेड पोलिसांकडे केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ashok Chavan: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येतेय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रत्यक्ष चव्हाण यांनीच सांगितले.

"माझा घातपात घडवण्याचा कट रचला जात आहे असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. माझा मेटे करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारच चव्हाण यांनी नांदेड पोलिसांकडे केली आहे." ही घटना समजताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

आपला विनायक मेटे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. आपल्या घातपातचा कट रचला जात असून भाडोत्री लोकांकडून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

यासंदर्भात त्यांनी नांदेड पोलिसांत तक्रार दिली असून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे.

"माझ्या लेटरपॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आणि राजकीयदृष्ट्या मला बदनाम करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असल्याचा अंदाज चव्हाण यांनी वर्तवला आहे.

मुंबई आणि नांदेडमध्ये माझ्यावर भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, अशीही शक्यता असल्याची भिती चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: गोवा पर्यटन कमी नव्हे वाढतंय! पर्यटनमंत्र्यांनी दिली आकडेवारी

जल वाहतुकीसाठी राज्यात होणार आधुनिक नियंत्रण प्रणाली! 50 कोटींची गुंतवणूक; बंदरांवरील ताण होणार कमी

Goa Crime: कोयत्याने हल्ला केला, मध्यस्थाचा घेतला चावा; मानसिक अस्वस्थतेचा दावा नाकारला, संशयितावर आरोप निश्चित

Leopard In Goa: डिचोलीत नेमके किती 'बिबटे' फिरताहेत? 2 पकडून नेले, तिसऱ्याच्या वावराच्या खाणाखुणा; स्थानिक भयभीत

Goa Weather: सकाळी गारवा, दुपारी ऊन-पावसाचा खेळ! थंडी पडणार की मुसळधार सरी कोसळणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT