Heat Wave: पुढील दोन दिवसात किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेच आवाहन, हवामान विभागाने दिलाय 'हा' इशारा

मागील दोन दिवस किनारपट्टीभागात प्रचंड प्रमाणात तापमान वाढले होते.
Heat Wave
Heat WaveDainik Gomantak
Published on
Updated on

फेब्रुवारी अर्ध्यावर आला असतानाच गोवा आणि कोकण किनारपट्टीवर उष्णता जाणवू लागली आहे. मागील दोन दिवस किनारपट्टीभागात प्रचंड प्रमाणात तापमान वाढले होते. या धर्तीवर हवामान विभागानंही राज्यातील तापमानाबाबत महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे.

यामध्ये विशेषत: कोकण किनारपट्टी आणि गोवा प्रांतातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोकण, रत्नागिरी आणि सदरील पट्ट्यामध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र असेल. मुंबई, रायगड भागातही तापमान वाढ दिसून येणार आहे.

'या' वेळेत घराबाहेर पडू नका:-

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात उष्णतेचं प्रमाण वाढणार आहे. तसेच तापमानाचा आकडा 37 ते 39 अंशावर जाण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाश्यांनी दुपारच्यावेळात उन्हात जाणे, उन्हातली कामे करणे अशा गोष्टी टाळाव्यात.

Heat Wave
International Mother Language Day : मंगळवारी मडगावात ‘भास-संवाद’, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक साधणार संवाद

आरोग्याची काळजी घ्या-

वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांची उष्ण प्रकृती आहे अशांनी तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. भर उन्हात फिरल्याने चक्कर येणं, अति प्रमाणात घाम येऊन रक्तदाब वाढणं, हृदयविकार जाणवणं असे प्रकार घडू शकतात.

त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्या. उन्हात जाताना पूर्ण बाह्यांचे हलके सूती कपडे वापरा. गडद रंगाचे कपडे टाळा. डोळ्यांवर गॉगल, डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ गुंडाळा. आहारात काकडी, संत्र, लिंबू, कलिंगड, कोकम सरबत, आवळा सरबत यांचा समावेश करावा. नियमित डोक्यावर तेल घालावं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com