Pune-Mumbai Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune-Mumbai Highway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 11 गाड्यांची एकमेकांना धडक Video

काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pune-Mumbai Highway Accident: पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिटजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 वाहनं एकमेकांना धडकली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या एक्स्प्रेस वेवर खुदबाईजवळ हा अपघात झाला. एक्सप्रेस वेवर एका कारने अचानक ब्रेक दाबला आणि त्यानंतर मागून धावणाऱ्या 11 गाड्या एकमेकांवर आदळल्याचं सांगण्यात येत आहे. या भीषण धडकेत चार महिला गंभीर जखमी झाल्या.

त्याचबरोबर पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूकही अपघातानंतर ठप्प झाली आहे. किरकोळ दुखापत झाली आहे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. बचावकार्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

या अपघातानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एकच खळबळ उडाली आहे. एवढी वाहने एकत्र आदळल्यानंतर गोंधळ उडाला. ही धडक इतकी जोरदार होती की अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी बचाव पथक पोहोचले आणि वाहनांमध्ये अडकलेल्या अनेकांना बाहेर काढले.

वैद्यकीय पथकही घटनास्थळी पोहोचले. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर जाम झाला होता. त्यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूकही वळवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

India T20 World Cup Squad: सूर्यकुमारसाठी हा 'वर्ल्डकप' शेवटचा? हरपलेल्या फॉर्ममुळे वाढले टेन्शन; गिलबाबतही प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

SCROLL FOR NEXT