Shirdi Sai Baba Temple Closed: साईभक्तासाठी मोठी बातमी! 1 मे पासुन शिर्डी बंदची हाक, वाचा एका क्लिकवर

1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.
Shirdi Sai Baba Temple
Shirdi Sai Baba Temple Dainik Gomantak
Published on
Updated on

Shirdi Sai Baba Temple Will Be Closed From May 1: देशभरातून शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या खुप आहे. सुट्टीमध्ये तर या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असल्यानं शिर्डीत दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी आहे. याचदरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. 

1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थ हा बंद पाळणार आहेत. शिर्डी ग्रामस्थांचा CISF नियुक्तीला विरोध आहे. त्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

साई मंदिरात CISF सुरक्षा नियुक्त करू नये, अशी शिर्डीतील ग्रामस्थांची मागणी आहे. CISF सुरक्षेमुळे भाविकांसह ग्रामस्थांना त्रास होणार असल्याचे शिर्डीकरांचे म्हणणं आहे. साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे.

अशात संस्थानकडे अगोदरच दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना केंद्रीय सुरक्षा का?, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.

बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे. CISF सुरक्षेला विरोधासह इतर काही मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत.

  • नेमकं प्रकरण काय ?

1 मे पासून शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थ यादरम्यान बंद पाळणार आहेत. साई मंदिरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या नियुक्तीला शिर्डी ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे.

मंदिरात सीआयएसएफ सुरक्षा नियुक्त करु नये अशी मागणी शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांची आहे.

या सुरक्षेमुळे भाविकांसह ग्रामस्थांना त्रास होणार असल्याचे शिर्डीमधील लोकांचे म्हणणे आहे. बंददरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरु राहाणार आहे.

CISF सुरक्षेला विरोधासह इतर काही मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत. साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे.

Shirdi Sai Baba Temple
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस उलटली; अपघातात 1 ठार, 25 जखमी
  • बंद दरम्यान 'हे' सुरु राहणार

शिर्डीत सर्व ग्रामस्थांनी 1 मे पासून बंदची हाक दिली आहे. यामुळे भाविकांची गैरसोय होय होण्याची शक्यता आहे. पण साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार अशी माहिती मिळाली आहे. सीआयएसएफ सुरक्षेच्या विरोधासह इतर काही मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत. साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com