Arjun Khotkar  Dainik Gomntak
महाराष्ट्र

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडी कारवाई

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर रामनगर सहकारी कारखाना बेनामी पध्दतीने फसवणूक करुन खरेदी केल्याचा आरोप आहे. यामध्ये खोतकर यांनी तब्बल शंभर कोटीचा घोटाळा केला, एवढचं नाही तर शेतकऱ्यांनी कारखान्यासाठी दिलेली सुमारे एक हजार कोटींची शंभर एकर जमीन बळकावल्याचा देखील त्यांनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, आज शिवसेना नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. जालन्यामधील कारखाण्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. मला या कारवाईसंबंधी काहीच माहिती नसल्याचे अर्जुन खोतकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. त्याचबरोबर संपूर्ण जगाला माहिती आहे, राज्यात काय चालंल आहे, असेही खोतकर म्हणाले.

तसेच, शिवेसना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांची इडीने दोन दिवसांपूर्वी चौकशी केली होती. यातच आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला गेला आहे.

बंडखोर आमदार कर्मचारी आणि सुरक्षेशिवाय गुजरातमध्ये पोहोचले होते

महाराष्ट्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएलसी निवडणुकीनंतर बंडखोर आमदार गुजरातच्या दिशेने जात असताना त्यांनी सुरक्षा रक्षक किंवा पीए सारख्या कोणत्याही सपोर्ट स्टाफला सोबत घेण्यास नकार दिला. त्यामुळे सुरक्षा कर्मचारी आणि सपोर्ट स्टाफला आमदारांच्या हालचालींची माहितीच पडली नाही. त्यामुळेच सरकार सुरक्षा कर्मचारी किंवा पीए कर्मचाऱ्यांवर सध्या कोणतीही कारवाई करत नाही. त्यात मोठी बाब म्हणजे कर्मचाऱ्यांनी ही माहिती नियंत्रण कक्षात दिली होती, त्याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगण्यात आले की, 'एकनाथ शिंदे 5 आमदारांसह गुजरातला जात आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'चायनामन'ची जादुई गोलंदाजी! UAE विरुद्ध एकाच षटकात घेतल्या 3 विकेट्स, पण हॅटट्रिक हुकली VIDEO

Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

SCROLL FOR NEXT