Devendra Fadnavis statement on Anil Parab ED case Dainik Gomantak
महाराष्ट्र

अनिल परबांना ईडीची नोटीस, फडणवीसांची प्रतिक्रिया...

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय अनिल परब (Anil Parab) यांना काल ईडीची (Enforcement Directorate) नोटीस आली आहे. महाविकास आघाडीचे तीन नेते हे सध्या ईडीच्या रडारवर असल्याचे समजते आहे. अनिल परब यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड (Jetendra Avhad) यांना देखील नोटीस येऊ शकते असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.भाजप अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर टीका करताना दिसत आहे. ज्या ज्या मंत्र्यांचे नाव समोर येत आहे त्या साऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका भाजप घेताना दिसत आहे.(Devendra Fadnavis statement on Anil Parab ED case)

परिवहन मंत्री अनिल परब याना यांना मिळालेल्या नोटीसबद्दल भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला कल्पना नसल्याचे सांगत त्रोटक प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान काल अनिल परब यांना नोटीस आल्या नंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र" अशी जोरदार टीका केली आहे .

तर नोटीस मिळाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया देताना ही नोटीस येणार असल्याची अपेक्षा होती असे सांगितले आहे. तसेच ही नोटीस कशासाठी आली हे माहिती नसुन, नोटीसमध्ये सविस्तर माहिती नसुन फक तपासाचा भाग म्हणून ईडीने आपल्याला कार्यालयात बोलवले असल्याची माहीती अनिल परब यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT