Uddhav Thackeray & Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

'महाराष्ट्र झुकेगा नहीं’...फडणवीसांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने विधानसभेतील चहापानावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून अर्थातच 3 मार्च सुरु होत आहे. याच्या एक दिवस आधीच म्हणजे बुधवारी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने विधानसभेतील चहापानावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली. फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Devendra Fadnavis Criticized The Mahavikas Aghadi Government)

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) पूर्णपणे समर्पित असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप पूर्ण ताकदीने करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, 'ठाकरे सरकार मुंबईविरोधात कारस्थान करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहे. परंतु महाराष्ट्र झुकणार नाही. ठाकरे सरकार दाऊद इब्राहिमसमोर पूर्णपणे नतमस्तक झाले आहे. महाराष्ट्र (Maharashtra) झुकणार नाही म्हणजे काय? महाराष्ट्र तुमचा आहे का?'

दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. जी व्यक्ती ईडीच्या ताब्यात आहे, तो मंत्रिपदावर कसा राहू शकतो, असा युक्तिवाद भाजपने केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आघाडी सरकारचे नेते म्हणतात की, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता का? मग नवाब मलिक यांनीही राजीनामा का द्यावा?

यावर भाजपने (BJP) युक्तिवाद असा केला की, 'दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत. इथे हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. टेरर फंडिंग, डी कनेक्शन, देशाच्या शत्रूकडून जमीन खरेदी करण्याचा विषय आहे.' एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT