मोहित कंबोज, गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्या : देवेंद्र फडणवीस

कंबोज, पडळकरांना सुरक्षा द्या : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisdainikgomantak
Published on
Updated on

मुंबई : मागील काही दिवसांत भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि मोहित कंबोज यांना लक्ष करण्यात येत आहे. तर पडळकर यांच्यावर आटपाडी येथे जमावाने हल्ला ही केला होता. त्यानंतर मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे मोहित कंबोज आणि गोपीचंद पडळकर यांच्या सुरक्षेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे. सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे म्हटले आहे. (Devendra Fadnavis says It is the responsibility of the state government to provide security)

Devendra Fadnavis
Mumbai High Court: लोकलने प्रवास करतायं, मग कोरोना नियम बंधनकारक

भाजपच्या आमदार खासदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्राव्दारे भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि मोहित कंबोज यांना लक्ष करण्यात येत असून त्यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यांना सरकारने सुरक्षा द्यावी अशी मागणीवर केली होती. त्यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या (BJP) आमदार खासदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलेल्या पत्राचा आधार घेतला आहे. तर नवाब मलिकांचे (Nawab Malik) काळे कारनामे उघड करणाऱ्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर हल्ला झाला. कंबोज त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला, त्यांना धमक्याही (threats) देण्यात आल्या. तर सरकारविरोधात (government) गोपीचंद पडळकर बोलतात म्हणून त्यांच्यावर हल्ला होणे हे सर्वांना बघीतलं आहे. सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com