Devendra Fadnavis  Dainik Gomantak
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस म्हणाले... पवारांचा पक्ष म्हणजे, 'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा'

फडणवीस यांनी आता त्यांनी गोव्यात राष्ट्रवादीने निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावरुनही खरपूस समाचार घेतला आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) पक्ष हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित असल्याचे फणवीसांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमन्तक

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत देशभरात उत्साह वाढला आहे. अशा स्थितीत नेत्यांनी प्रचारसभेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. भाजपच्या वतीने गोवा निवडणूक 2022 चे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटले, गोव्यात शिवसेनेची लढत म्हणजे यावेळी त्यांच्या उमेदवारांना 'NOTA' इतकीच मते मिळण्याएवढी आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी आता त्यांनी गोव्यात राष्ट्रवादीने निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावरुनही खरपूस समाचार घेतला आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) पक्ष हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित असल्याचे फणवीसांनी म्हटलं आहे. त्यांच्या पक्षाबद्दल एवढंच म्हणता येईल की, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, त्यात तू तो रंग मिसळतोस. उत्तर प्रदेशात ते सपासोबत सामील होऊन सपासारखे बनतात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) काँग्रेस आणि शिवसेनेत सामील होऊन त्यांच्यासारखे होतात. त्यांना स्वतःचे अस्तित्व नाही. त्यामुळे त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही शक्ती नाही. अशा स्थितीत गोव्यात (Goa) त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

त्यावर, देवेंद्र फडणवीस यांच्या या टोमण्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उत्तर दिले आहे. पवार म्हणाले की, 'शरद पवार यांची उंची आणि त्यांनी राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कार्याचे महत्त्व लक्षात घ्यावे. नव्या पिढीने त्यांच्यावर काहीही बोलण्यापूर्वी थोडा विचार करावा.'

महाराष्ट्रात आमचं काम चांगलं चाललयं

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते परंतु महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता ते भाजपकडून (Bjp) गोव्याचे निवडणूक प्रभारी आहेत. फडणवीसांच्या टीकेला उत्त देताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'तुम्ही मला महाराष्ट्राबाबत काहीही विचाराल तर, मी त्याबाबत ठोस आणि अचूक उत्तर देईन. देशाच्या राजकारणावर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बोलतात. परंतु मी नक्की म्हणेन की, कुणालाही लहान समजण्याची चूक करु नका. सांगायचे झाल्यास बरेच काही सांगता येईल. मी राजकीय जीवनात 30 वर्षे घालवली आहेत. मला बारामतीच्या जनतेने खासदार बनवून संसदेत पाठवले होते. परंतु सहा महिन्यात मी परत राज्यामध्ये आलो. त्यानंतर शरद पवारांना दिल्लीला जावे लागले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झालो. महाराष्ट्रामधील कामावर मी समाधानी आहे. माझे काम इथे चांगलं चाललं आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: एलईडी मासेमारी आणि बुल ट्रॉलिंगवर कारवाई करण्यासाठी एक संयुक्त यंत्रणा तयार

Illegal Gambling: गोव्याच्या कॅसिनोत मोठी कारवाई! 11 जणांना अटक; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bicholim News: 10 गुरांचे बळी, वाहनचालक गंभीर जखमी; डिचोलीत भटक्या जनावरांमुळे अपघातांचा धोका

SCROLL FOR NEXT