Dance Viral Video Dainik Gomantak
महाराष्ट्र

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Konkan Youth Dance Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून हसू येतं, काही व्हिडिओ हृदय पिळवटून टाकतात तर काही व्हिडिओ थेट मनाचा ठाव घेतात.

Sameer Amunekar

Dance Viral Video

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून हसू येतं, काही व्हिडिओ हृदय पिळवटून टाकतात तर काही व्हिडिओ थेट मनाचा ठाव घेतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ नेटीझन्समध्ये जबरदस्त गाजत असून त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

हा व्हिडिओ खास आहे कारण त्यात कोकणाच्या पारंपरिक रंगतदार मस्तीला आधुनिक ठेक्याची जोड मिळाली आहे. “माझ्या डोईवरी भरली घागर रे” या लोकप्रिय गाण्यावर कोकणातील काही तरुण पोरांनी असा धमाकेदार डान्स सादर केला आहे की, पाहणाऱ्यांचे पाय आपोआप ताल धरायला लागतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसणारी उत्स्फूर्तता पाहून नेटीझन्स अक्षरशः थक्क झाले आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खरा टॅलेंट गावातच आहे”, “एक नंबर परफॉर्मन्स”, “मस्त धमाल केली” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत.

कोकण म्हटलं की निसर्गरम्य सौंदर्य, मालवणी भाषा, पारंपरिक खेळ आणि मस्ती आठवते. त्याचाच प्रत्यय या डान्स व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. साधेपणातही किती मजा दडलेली असते याचं उत्तम उदाहरण या पोरांनी सादर केलं आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तुम्ही भाजपचे एजंट, हिम्मत असेल तर समोर येऊन चर्चा करा", पाटकरांचे केजरीवालांना थेट आव्हान; गोव्यात राजकीय जुगलबंदी! Watch Video

Leopard In Goa: ..पुन्हा बिबट्याची डरकाळी! डिचोली परिसरात दहशत; रात्री रस्त्यांवर शुकशुकाट

Vasco Accident: टेम्पो-मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात, दोन्‍ही चालक जखमी; वाहतूक काही काळ ठप्प

Canacona: बाजार करण्यासाठी नेले, दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून केला खून; गोव्यातून गेला बिहारला, संशयिताची झाली निर्दोष सुटका

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

SCROLL FOR NEXT