Lockdown Dainik Gomantak
महाराष्ट्र

लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची लवकरच होणार गुन्ह्यातून मुक्तता

कोरोनाचा वाढता धोका पाहता देशासह राज्यातही लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारने विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना हाती घेतल्या आहेत. कोरोनाचा वाढता धोका पाहता देशासह राज्यातही लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला होता.

दरम्यान, राज्यात संचारबंदी, नाईट कर्फ्यू (Night Curfew) अशा स्वरुपात निर्बंध लावण्यात आले होते. या काळात ज्या नागरिकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र हे गुन्हे रद्द करण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारच्या विचारधीन असून, लवकरच त्याबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

तसेच, महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू असताना, नंतरच्या काळात संचारबंदी लागू असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचार बंदीच्या काळात दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारच्या विचारधीन असून लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

याशिवाय, ''लॉकडाऊन काळात विद्यार्थी आणि नागरिकांवर 188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे परत घेण्याचा गृहविभागाचा तत्त्वतः निर्णय झालेला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहोत. कारण विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी जाताना बऱ्याच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आमचा हा प्रयत्न आहे,'' असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

त्याचबरोबर, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारकडून वेळोवेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नाईट कर्फ्यू, जमावबंदी अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आले आहेत. मात्र लॉकडाऊन काळात राज्य सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करत घराबाहेर पडलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT