उत्तर भारतातील राज्यांमध्ये कधी ऊन तर कधी पावसाची प्रक्रिया सुरू असते. अनेक राज्यांमध्ये सतत बदलत असलेल्या वातावरणात रविवारी कडाक्याची ऊन पडली, त्यामुळे अनेक दिवसांपासून थंडीने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा हवामान (Weather) बदलू शकते आणि अनेक राज्यांमध्ये थंडी वाढू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. (Weather Update Latest News)
आज राजधानी दिल्लीच्या (Delhi) तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, बुधवारपासून पुन्हा एकदा हवामान बिघडू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी आणि पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा हवामान खराब राहील. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. उत्तराखंडमध्ये उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी
उत्तराखंडमध्ये रविवारी हवामान स्वच्छ होते. बर्फवृष्टी थांबल्यानंतर चंबा-धनौल्टी हा मार्ग तीन दिवसांनी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तर गंगोत्री आणि यमुनोत्री महामार्ग अजूनही बंद आहेत. दरम्यान, काल हरिद्वारमध्ये ऊन पडले होते, मात्र डोंगराळ भागात बर्फ वितळल्याने दिवसभर जोरदार वारे वाहत राहिल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला नाही.
मसुरी मधील हवामान
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मसुरीमध्ये येत्या काही दिवसांत हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, येथे हलका सूर्यप्रकाश देखील येऊ शकतो, ज्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल.
पंजाब, हरियाणामध्ये थंडी
दुसरीकडे, यूपीमध्ये येत्या दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुढील २४ तास पंजाब आणि बिहारमध्ये थंडीच्या दृष्टीने जोरदार असू शकतात. IMD नुसार, पुढील 3 दिवसांत उत्तर प्रदेशात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये पुढील दोन दिवस दाट धुके राहण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.