Covid19 Restrictions : Compulsory of RTPCR in Karnatak  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोगनोळी नाक्यावर आरटीपीसीआर सक्तीची..!

कडक बंदोबस्त : वाहनांच्या लांब रांगा....

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र Covid19 Restrictions : कर्नाटक - महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी नजीक असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर RTPCR चाचणी बंधनकारक केली असून सध्या नाक्यावर तपासणी चालू आहे. रक्षरिय महामार्गावर वाहनाच्या लांब रंगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

बंगळूर, धारवाड येथे कोरोना (Covid) रुग्ण सापडल्याने बेळगाव जिल्ह्यातील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला असून आरटीपीसीआर अहवाल असणाऱ्या प्रवाशांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. दरम्यान सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील गडहिंग्लज, आजरा, उत्तूर, चंदगड याठिकाणच्या प्रवाशांचे ओळखपत्र बघून मगच पुढे सोडले जात आहे.

गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी तपासणी बंद करण्यात आली होती परंतु अचानक तपासणी सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असून राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य, महसूल व पोलिस विभागाने बंदोबस्त ठेवला आहे.

निपाणी मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, एम. एस. सूर्यवंशी व पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT