Chandrapur Footover Bridge Collapse Dainik Gomantak
महाराष्ट्र

Chandrapur Footover Bridge Collapse: बल्लारपूर रेल्वे स्थानकावर भीषण दुर्घटना; रेल्वेकडून गंभीर जखमींना 1 लाख रुपयांची मदत

फूट ओव्हर ब्रिजच्या प्री-कास्ट स्लॅबचा काही भाग सायंकाळी 5.10 च्या सुमारास खाली कोसळला.

दैनिक गोमन्तक

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्षिका असलेल्या 48 वर्षीय नीलिमा रंगारी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेत 13 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांना तातडीची मदत करीत रेल्‍वे प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिकेद्वारा रुग्णालयात पोहोचवून त्‍यांच्‍यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

रेल्वेने गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि साध्या जखमींना 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. जखमी व्यक्तींना लवकर बरे होण्यासाठी इतर रुग्णालयात हलवून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल
     
    बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवरील फुटओव्‍हर ब्रिजचा (Footover Bridge Collapse) एक भाग कोसळल्याने जखमी सर्वांना तातडीची मदत करीत रेल्‍वे प्रशासन व पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिके द्वारा रुग्णालयात पोहचवून त्‍यांच्‍यावर तातडीने उपचार सुरु झाले आहेत.

    यापैकी काही रुग्‍णांना चंद्रपूर येथील जिल्‍हा सामान्य  रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ही बातमी समजतांच राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत  सर्व जखमींना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍याचे निर्देश जिल्‍हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले.

    तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्‍याचे निर्देश मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधीक्षक परदेशी यांना दिले आहेत. अपघातानंतर लगेचच भाजपाचे बल्‍लारपूर येथील पदाधिकारी रेल्‍वे स्‍टेशनवर (Raily Station) पोहोचून त्‍यांनी जखमींना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budargad Accident: गोव्याहून नेपाळकडे जाणाऱ्या बसचा अपघात! चालकाचे नियंत्रण जाऊन घुसली शेतात; 2 प्रवासी गंभीर जखमी

Horoscope: पैशाचा पाऊस पडणार, परदेशी जाण्याची संधी; 'या' राशींचे बदलणार भविष्य

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

SCROLL FOR NEXT