Sanjay Pandey dainik gomantak
महाराष्ट्र

CBI कडून महाराष्ट्र पोलीस आयुक्त संजय पांडेंची चौकशी

पोलीस आयुक्तांवर देशमुख प्रकरणात परमबीर सिंहना धमकावल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

मुंबई : महाराष्ट्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. तर सध्या देशमुख यांना ईडीने आपल्या ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खटला सुरू आहे. तर याच प्रकरणात पांडे यांनी माजी आयुक्त परमबीर सिंह यांना फोन करुन देशमुखांविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी धमकावण्याचा प्रयत्न केला होता. असा आरोप पांडे यांच्यावर आहे. त्यामुळे मुंबई नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सीबीआयने शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांची जवळपास 6 तास चौकशी करण्यात आली असून जबाबही नोंदवित आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिस खात्यात आणखीन कोणता भूकंप होणार काय याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (CBI inquires into Maharashtra Police Commissioner Sanjay Pandey in Anil Deshmukh case)

काय आहे प्रकरण

महाराष्ट्रात गेल्या वर्षी पोलिस खात्यात बदल्यांचे वारे वाहत होते. त्यावेळी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गृहरक्षक (Home guard) विभागात बदली करण्यात आली होती. त्यावरून सिंह यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्रातून व्यक्त केली होती. तसेच अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रार देखीस केली होती. त्यावेळी त्यांनी 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आदेश दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) वर अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. तर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्यासाठी भाग पाडले होते. त्यानंतर देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तर परमबीर सिंह यांच्या विरोधातही चौकशी सुरू झाली.

दरम्यान तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Commissioner of Police Parambir Singh) यांना फोन करून त्यांचे पत्र मागे घेण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल केले जातील, असे म्हटले होते. त्यावेळी त्यांच्यातील संभाषण उघड झाले होते.

तसेच त्यावेळी महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) केंद्रीय यंत्रणांमार्फत सुरू असलेला तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग करावा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावेळी सीबीआयने (CBI) मुंबई उच्च न्यायालयाला (Mumbai High Court) सांगितले होते की, संजय पांडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना केंद्रीय यंत्रणांच्या तपासापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते परमबीर सिंह यांच्यावर दबाव टाकत आहे, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT