Nagpur Crime News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nagpur: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे 3 अधिकारी CBI च्या ताब्यात; काय आहे प्रकरण?

पेट्रोल पंप चालकाकडून लाच घेताना रंगेहात पकडले

दैनिक गोमन्तक

Nagpur Crime News: सीबीआयने नागपुरात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) च्या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या लोकांवर पेट्रोल पंप चालकाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच घेताना सीबीआयने (CBI) अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. (CBI arrested 3 IOC officials caught red handed taking bribe)

किरकोळ विक्री विभागाचे महाव्यवस्थापक एनपी रोडगे, मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले, गोंदिया क्षेत्राचे विक्री व्यवस्थापक सुनील गोलार यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन अधिकाऱ्यांनी गोंदियातील दोन पेट्रोल पंप चालकांकडे मालकीहक्क हस्तांतरणासाठी पैशांची मागणी केली होती.

ऑपरेटरने याची तक्रार सीबीआय नागपूर (Nagpur) युनिटकडे केली आणि त्यानंतर सीबीआयने सापळा रचून त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले. नुकतेच महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पीडब्ल्यूडीच्या (PWD) एका अभियंत्याला कंत्राटदाराकडून लाच घेताना पकडण्यात आले. यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान पीडब्ल्यूडी अभियंत्याच्या लॉकरमधून 27 लाख रुपयांहून अधिक रोख आणि सोने जप्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT