महाराष्ट्र

प्री-वेडिंग शूटला विदर्भातून गाठला गोवा, रात्री एकत्र राहिले अन् सकाळी लग्न मोडले

गोव्याच्या किनारी असं काय झालं? विदर्भाचं कपल प्री-वेडिंग शूटसाठी गोव्यात गेलं अन् लग्न मोडून घरी आलं

दैनिक गोमन्तक

लग्नाआधी प्री-वेडिंग शूटची क्रेज हल्ली खूप वाढली आहे. आणि या शूट दरम्यान अनेक बाहेर ठिकाणी एकटं जाण्याचा प्रसंगही मुला-मुलींवर येतो. असाच एक किस्सा गोव्यात घडला आहे. कारण आपला गोवा तर प्री-वेडिंग शूटसाठी फेमसच आहे.(pre wedding shoot in Goa)

प्री-वेडिंग शूटची करण्याचा ट्रेण्ड सगळीकडे पसरत असताना चिखली तालुक्यात या प्रकारातून लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबत तरुणी प्री-वेडिंग शूटसाठी गोव्याला गेली होती. एक रात्र दोघांचा एकाच खोलीत मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नवरदेवाने मला तुझ्याशी लग्न करायचे नसल्याचे सांगत लग्न मोडल्याचे जाहीर केले. मला जशी हवी होती तशी तू नाहीस, असे त्याने सांगितले. या प्रकारामुळे नवरी अन् तिच्या कुटुंबाला मात्र मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली नसून, या प्रकरणावर सामाजिक स्थरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील 20 वर्षीय तरुणीचे चिखली तालुक्यातील एका 25 वर्षीय तरूणाशी लग्न ठरले होते.

आतापर्यंत प्रेमाने वागणारा तिचा होणारा नवरा झोपेतून उठल्यावर बदलला होता. त्याने तिथेच तिचा महागडा मोबाईल फोडला. स्वतःच्या अंगावरील कपडे फाडले. मला तू जशी हवी तशी नाहीस, असे म्हणत त्याने आदळआपट केली अन् आता आपले लग्न मोडले, असे गोव्यातच जाहीर केले.

घाबरलेली तरुणी मैत्रिणीसोबत कशीबशी घरी पोहोचली व आई-वडिलांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. असे असले तरी त्यांनी तक्रार देण्याचे टाळले असून, सामाजिक पातळीवर प्रकरणाचा निपटारा करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत.

जानेवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला. मुलगा पुण्यात इंजिनियर असून एका कंपनीत नोकरी करतो. मात्र, कोरोना काळापासून त्याचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. साखरपुडा तिच्या मैत्रिणीसाठी व तिच्यासाठी एक झाल्यानंतर तरुणाने होणाऱ्या बायकोला महागडा मोबाईल गिफ्ट केला. त्यामुळे तासंतास फोनवर दोघांचं बोलण व्हायचं. दरम्यान एप्रिल महिन्यात फोटोग्राफरसाठी दोघांनी गोव्यात रूम बूक करायचे ठरवले. आपल्या मित्र मैत्रिणींना घेऊन ते दोघेही गोव्याला प्रि-वेडिंगसाठी निघाले होते.

तिथे गेल्यावर त्यांनी रुम बुक केली. दिवसभर फोटो, व्हिडिओ शूट केल्यावर रात्री हॉटेलात मस्त जेवण केले. यात तिची मैत्रिण आणि तिच्यासाठी एक रुम आणि फोटोग्राफर स्टाफसाठी एक रुम तसेच तरुणाने त्याच्यासाठी एक अशा तीन रुम बुक केल्या होत्या. रात्रीच्या जेवणानंतर तरुणाने आपल्या होणाऱ्या बोयकोला आपल्या रुममध्ये बोलावले. यानंतर दोघांनी सोबत वेळ घालवला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याच्या किनारी सगळा राडा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

2000 Note: 2000 च्या नोटांबाबत RBI कडून मोठी अपडेट, अजूनही 5817 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात

Horoscope: पैसा खळाळणार! त्रिपुष्कर योग ठरणार फलदायी; 'या' 5 राशींचे दिवस बदलणार

Goa Accident: डिचोलीत भीषण अपघात! बगलमार्गावर व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

Chorao Ferryboat: निष्काळजीपणामुळे बुडाली होती 'बेती फेरीबोट'! चोडण दुर्घटनेबाबत बंदर कप्तान खात्याचा अहवाल सादर

Mapusa Fish Market: 'म्हापसेकरांना आणखी संकटात लोटू नये'! म्हापसा पालिकेला मासळी मार्केट अस्वच्छतेवर नोटीस; काँग्रेस करणार स्वच्छता

SCROLL FOR NEXT