महाराष्ट्रात (Maharashtra) उद्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी महिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. राज्यातील शाळा उद्या पासून सुरू होत आहेत, परंतु मुंबईतील शाळांबाबत (School Reopen) अजूनही संभ्रम आहे. याबाबत मुंबई पालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) शाळा सुरु होण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मध्ये उद्यापासून शाळा सुरु होणार नसल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.
मुंबई महानगरपालिके (Mumbai Municipal Corporation) अंतर्गत शाळा 1 तारखेपासून सुरू होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. यामुळे मुंबईतील 1 ली ते 7 वी च्या शाळा सुरु होणार नाहीत. तसेच या शाळा आता 15 डिसेंबरपासून सुरु होतील. अशी माहिती मुंबई पालिकेने दिली आहे.
कोरोनाच्या(Corona) नवा विषाणू ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे उद्यापासून शाळा सुरू होतील की नाही? असा प्रश्नचिन्ह शिक्षक आणि पालकांसमोर उभा राहिला आहे. शाळाबाबत पालिकेची नुकतीच बैठक झाली असून या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्यापासून शाळा सुरु!
राज्य सरकारने शाळा सुरु करण्याबाबत आदेश काढून 1 डिसेंबरपासून सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करणार असल्याचा अध्यादेश काढला. 1 ली ते 4थी ग्रामीण तर 1 ली ते 7 वी शहरी भागात 1 डिसेंबरपासून सुरू करणार आहेत. यामध्ये एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असणार तसेच एका बेंचवर एकच विद्यार्थी बसणार अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ओमायक्रॉन (Omicron) विषाणूच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येणार आहे. विद्यार्थींनी (student) शाळेत मास्क घालणे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण बंधनकारक केले आहे. अशी सूचना दिली आहे.
काय आहे नियमावली:
एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी
एका बाकावर एकच विद्यार्थी
दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर
शिक्षकांची राहण्याची सोय त्याच गावात त्याच शहरात
गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या आवारात येऊ नये
काही वर्ग सकाळी तर काही वर्ग दुपारी
विद्यार्थींनी शाळेत असताना मास्क व्यवस्थित घालावे
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण
विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे नाही याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी
स्कूल बसचा वाहन चालक, मदतनीस यांचेही लसीकरण
बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसाने घ्यावी
सत्रात शाळा भरवायचे
3 ते 4 तासच शाळा भरणार
मैदानी खेळ तसेच विविध कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक
घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच
जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण
पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.