BJP Will form government in Maharashtra in March says Narayan Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्यात लवकरच भाजप सरकार, नारायण राणेंचं भाकीत

एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे महाराष्ट्रात मार्चमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील भाजपचे अनेक नेते दिल्लीत आहेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत (Mahavikasaghadi) मोठा दावा केला आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्र सरकार पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच येथे भाजपचेच (BJP) सरकार स्थापन होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे . भाजपचे सरकार आल्यास राज्यात मोठा बदल दिसेल असा विश्वास देखील राणे यांनी म्हण्टले आहे. राणे म्हणाले की सरकार बनवायचे असेल किंवा सरकार पाडायचे असेल तर काहीतरी लपवावे लागते . महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे नाव घेत त्यांनी मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन करण्याचे बोलले असल्याचे सांगितले. हे सत्य असून त्याला सिद्ध करण्यासाठी आम्ही काम करू अशी अशाही राणेंनी व्यक्त केली आहे. (BJP Will form government in Maharashtra in March says Narayan Rane)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोनिया गांधींना त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर न भेटून आणि काँग्रेसच्या (Congress)अनेक बड्या नेत्यांना टीएमसीमध्ये (TMC)सामील करून राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचे संकेत द्यायला सुरुवात केली आहे.2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) चा विस्तार करण्यात व्यस्त आहेत आणि राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे की ममता त्यांच्या पक्षाला भाजपच्या विरोधात काँग्रेसचा पर्याय म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मंगळवारी मुंबईत येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेणार आहेत.

एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे महाराष्ट्रात मार्चमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील भाजपचे अनेक नेते दिल्लीत आहेत. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अमित शहांसोबतच्या या बैठकीला उपस्थित राहणार होते, मात्र विमानाला उशीर झाल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.

तर भाजपसह काँग्रेस आणि राष्टवादीचेही नेते सध्या दिल्लीत आहेत. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, फडणवीस आणि पाटील केंद्रीय नेतृत्वाशी संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्राने सांगितले की, संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पवार दिल्लीला गेले असून त्यांचे वेळापत्रक आठवडाभरापूर्वीच ठरले होते.

त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या या विधानानंतर नेमकं इतर पक्षांच्या काय भुमिका येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT