Mumbai High court
Mumbai High court Dainik Gomantak

मुंबई उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेत केला बदल!

तीन पुनरावृत्ती गुन्हेगारांना (criminals) फाशी देण्यात आली तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
Published on

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) तीन दोषींची फाशीची दिली होती. त्यामध्ये त्यांनी आता बदल करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फाशीच्या शिक्षेला मंजुरी मिळावी म्हणून राज्य सरकारच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

4 एप्रिल 2014 रोजी मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यामध्ये तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. या तिन्ही दोषींना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात (Court) हजर केले. यावेळी न्यायमूर्ती एसएस जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चौहान यांनी या खटल्याचा निकाल सुनावला आहे.

2013 मध्ये शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात 2 गुन्हे दाखल झाले होते. छायाचित्रकार पत्रकार सामूहिक बलात्कार प्रकरण आणि टेलिफोन ऑपरेटर सामूहिक बलात्कार प्रकरण. फोटोजर्नालिस्ट (Photojournalist) प्रकरणात 1 अल्पवयीनासह 5 दोषी आहेत. टेलिफोन ऑपरेटर प्रकरणात 5 दोषी आहेत, ज्यामध्ये 1 अल्पवयीन आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये तीन दोषी एकच असून, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Mumbai High court
परमबीर सिंहांची कसाबसह अनेक दहशतवाद्यांना मदत, माजी पोलीस अधिकाऱ्याचे आरोप

नेमके काय आहे हे प्रकरण

22 ऑगस्ट 2013 रोजी महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये काम करणाऱ्या महिला फोटो पत्रकारावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. यानंतर 23 ऑगस्ट 2013 रोजी या प्रकरणात पहिली अटक झाली. यामध्ये अल्पवयीन (Underage) आरोपीला अटक करण्यात आली होती. 24 ऑगस्ट 2013 रोजी दुसरा आणि तिसरा आरोपी यांनाही यालाही अटक करण्यात आली. यानंतर 25 ऑगस्ट 2013 रोजी चौथा आणि पाचवा आरोपीला अटक करण्यात आली.

पीडित छायाचित्र पत्रकाराचे जबाब 26 ऑगस्ट 2013 रोजी नोंदवण्यात आले आणि 27 ऑगस्ट 2013 रोजी पीडितेला रुग्णालयातून सोडण्यात आले. 3 सप्टेंबर 2013 रोजी आणखी एक पीडिता समोर आली. 19 वर्षीय टेलिफोन ऑपरेटरने पोलिसांना सांगितले की, 31 जुलै रोजी तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता, ज्यात आधीच अटक करण्यात आलेल्या तीन जणांचा समावेश होता.

Mumbai High court
डिसेंबरमध्ये राज्यात कोरोनाची तिसरी लाट, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा इशारा

यानंतर सप्टेंबर 2013 रोजी पीडित मुलीने ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले. यानंतर 19 सप्टेंबर 2013 रोजी मुंबई गुन्हे शाखेने सुमारे 600 पानांचे आरोपपत्र दाखल केले. 14 ऑक्टोबर 2013 रोजी खटला सुरू झाला. 17 ऑक्टोबर 2013 रोजी पीडितेने न्यायालयात आरोपीला ओळखले. 13 जानेवारी 2014 रोजी पीडितेच्या सहाय्यक आणि प्रत्यक्षदर्शीने आरोपीला ओळखले. 20 मार्च 2014 रोजी मुंबई सत्र न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवले. 4 एप्रिल 2014 रोजी, तीन पुनरावृत्ती गुन्हेगारांना फाशी देण्यात आली तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com