Banda accident midnight Dainik Gomantak
महाराष्ट्र

Banda Accident: बांदा पुलावर मध्यरात्री थरार! कार ओहोळात कोसळली, काहीजण अडकल्याची भीती; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू

Banda Bridge Accident: मुंबई-गोवा महामार्गावर बांदा बसस्थानकाजवळ एका दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली एक कार ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली

Akshata Chhatre

बांदा: मुंबई-गोवा महामार्गावर बांदा बसस्थानकाजवळ एका दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली एक कार (MH 07 AG 0004) मध्यरात्रीच्या सुमारास ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली आहे. हा अपघात गुरुवारी (३ जुलै) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अपघाताच्या वेळी ओहोळ तुडुंब भरलेला होता आणि पाण्याचा प्रचंड वेग, तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने हा अपघात लगेच लक्षात आला नाही. त्यामुळे, कारमध्ये कोणी अडकले असण्याची शक्यता असल्याने, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

स्थानिकांकडून पोलिसांना माहिती

आज सकाळी ही घटना बांदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ याची माहिती बांदा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांना दिली. माहिती मिळताच बांदा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे.

पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने आणि कार पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने, आतमध्ये कोणी आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या आगमनानंतर शोधमोहिमेला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT