Valpoi Accident
Valpoi AccidentDainik Gomantak

Goa Accident: बस नसल्याने लिफ्ट घेतली अन् मद्यधुंद ट्रक चालकाने धडक दिली; महिला सुरक्षा रक्षक जागीच ठार

Valpoi Accident: रेडिघाट येथील गणेश मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. मद्यधुंद ट्रकचालकाने स्कूटरला जोरदार धडक दिल्यामुळे वनिता मोर्लेकर पोकळे या महिला सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला.
Published on

वाळपई : रेडिघाट येथील गणेश मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. मद्यधुंद ट्रकचालकाने स्कूटरला जोरदार धडक दिल्यामुळे वनिता मोर्लेकर पोकळे या महिला सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात स्कूटरचालक गणेश बेतकेकर हा जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

धडकेनंतर मद्यधुंद चालक ट्रकसह पसार झाला. मात्र, जागरूक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले आणि बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. वनिता मोर्लेकर पोकळे (वय ४० वर्षे) या मूळच्या कोपार्डे येथील असून लग्नानंतर देसाईनगर-साखळी येथे राहात होत्या.

त्यांना ६ वर्षांचा मुलगा आहे. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेने त्यांना वाळपई इस्पितळात आणण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे. या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस करीत आहेत.

Valpoi Accident
Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! गोव्यात एकाच टप्प्यात होणार परीक्षा

दरम्यान, वनिता यांच्या मृत्यूच्या वार्तेने कोपार्डे, साखळी तसेच वाळपई इस्पितळातील त्यांचे सहकारी आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली. हसतमुख आणि सर्वांना मदत करणारी वनिता अपघातात निवर्तल्याने अनेकांनी शोक व्यक्त केला. इस्पितळ परिसरात त्यांच्या अंतिम दर्शनासाठी बरीच गर्दी झाली होती.

Valpoi Accident
Goa News: ढवळी येथील भगवती मंदिरासमोरील रस्त्यावर धावत्या कारला आग; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

बस नसल्याने लिफ्ट घेतली अन्...: वनिता या वाळपई इस्पितळात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता ड्यूटी संपवून त्या साखळी येथे घरी परतण्यासाठी निघाल्या. मात्र, रात्री बसची सोय नसल्याने त्या बेतकेकर यांच्या दुचाकीवरून साखळीकडे येत होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com