Balasaheb Thorat Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Congress: वाढदिवशीच बाळासाहेब थोरातांनी दिला गटनेते पदाचा राजीनामा; 'हे' आहे कारण

Congress: नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते अशी चर्चा सुरू असतानाच थोरात यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Congress: बाळासाहेब थोरात यांना कॉंग्रेसच्या गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. थोरात यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे, पटोलांवर नाराज असल्याने बाळासाहेब थोरात यांनी हा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.

नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते अशी चर्चा सुरू असतानाच थोरात यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल घेतली असून प्रभारी एच के पाटील मुंबई( Mumbai )कडे रवाना झाले आहेत. पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवले असून बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एच के पाटील हे थोरातांची समजूत काढणार असल्याचे म्हटले जात आहे. बाळासाहेब थोरात हे पक्षाचे जेष्ठ नेते आहेत, त्यांचा राजीनामा हा व्यथित करणारा आहे. त्यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या नेत्यानी आणि हायकमांड यांनी विचार करायला हवा,असे सुधीर तांबेंनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याचे आपल्याला सांगितले होते, असे अजित पवार( Ajit Pawar ) यांनी म्हटले आहे. दरम्यान, थोरात यांनी आपल्या वाढदिवसादिवशीच गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT