Chandrkant Patil  Dainik Gomantak
महाराष्ट्र

“बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवांनी हिंदुत्व मिठी नदीत बुडवलं''

चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर निशाणा

दैनिक गोमन्तक

मुंबई : गेले काही दिवस महाराष्ट्रात राजकिय वातावरण तापले असून शिवसेना आणि राणा दाम्पत्य या दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन गटात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना शनिवारी अटक करण्यात आल्यानंतर आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.(Balasaheb Thackeray's son drowned Hindutva in Mithi river)

“उत्तम! हिंदू धर्मियांचा पवित्र “हनुमान चालिसा” म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं”!” असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सुनावणीच्या सुरुवातीला सरकारी वकीलाकडून राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करत आली होती. त्यांच्या विरोधात १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=_Zma3hByaeMदुसरीकडे, राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट म्हणाले की, “राणा दाम्पत्याने राज्य सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्याचे सिद्ध करणारा एकही पुरावा सरकारी वकील सादर करू शकले नाहीत. या लोकांना हनुमान चालिसाचे पठण करायचे होते आणि प्रार्थना करणे गुन्हा नाही. हनुमान चालिसामध्ये रामाची स्तुती केली आहे.देशात हनुमान चालीसा वाचणे गुन्हा ठरला असेल तर सर्व मंदिरांना टाळे ठोकले पाहिजेत.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT