“मैं करू तो साला, कॅरेक्टर ढीला है”

अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा
amruta fadnavis
amruta fadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील नागरीक वाढत्या अन्नधान्याच्या किंमती, भडकलेले इंधनाचे दर, उच्चांकी गाठलेल्या खाद्य तेलाच्या किंमती, दिवसें -दिवस कोलमडत असलेलं सामान्य नागरीकांचे अर्थिक बजेट याकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिंधीकडे वेळच नाही. कारण सामान्य नागरीकांच्या आयुष्यातीस समस्यांचे उपाय शोधण्यापेक्षा लोकप्रतिनिंधीना एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करत चिखलफेक करणे महत्त्वाचं वाटतं. याचं पार्श्वभूमीवर गेले काही दिवस महाराष्ट्रात सर्वात खालच्या स्तरावर राजकारणाचा स्तर पोहोचला असून आरोप - प्रत्यारोपाची मालिका संपायला तयार नाही.( Amrita Fadnavis targets Shiv Sena )

amruta fadnavis
राणा दाम्पत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. राणा दाम्पत्याची अटक त्यानंतर शनिवारी रात्री उशीरा किरीट सोमय्यांच्या गाडीवर झालेली दगडफेक राजकीय वादासाठी कारणीभूत ठरली. या मुद्द्यांवरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला आहे. यासाठी त्यांनी सलमान खानच्या एका चित्रपटातल्या गाण्याच्या ओळी बदल करून लिहिल्या आहेत!

amruta fadnavis
मतांचा जोगवा मागण्यासाठी भाजपने राष्ट्रात द्वेश पसरवला : शरद पवार

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्या शनिवारी मुंबईत देखील हजर होत्या. मात्र, शिवसेना कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मातोश्री आणि राणा यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिल्यामुळे राणा दाम्पत्याला घराबाहेर पडता आलं नाही. अखेर दुपारी त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं. मात्र, सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.

अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी रात्री उशीरा भाजपा नेते किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले. मात्र, तिथून परत निघताना त्यांच्या गाडीवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये गाडीची एक काच फुटली. तसेच, किरीट सोमय्यांना किरकोळ जखम देखील झाली. मात्र, हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाने पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी करवला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. भाजपानं देखील या दोन मुद्द्यांवरून सत्ताधारी शिवसेनेवर टीका करायला सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com