औरंगाबाद: काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना (Congress NCP and ShivSena) एकत्रपणे लग्न करीत आहेत. मग हा तीन बायकांचा संसार आहे असे म्हणत हे कुठलं सेक्युलॅरिझम आहे? असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. MIM चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी 2 दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
MIM मुंबईपर्यंत (Mumbai) मुस्लिम आरक्षणासाठी हातात तिरंगा झेंडा घेऊन दुचाकी रॅली काढणार असल्याचे ओवेसी यांनी जाहीर केले आहे.मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ही रॅली काढली जाणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबाद माहिती दिली आहे. सर्वच पक्षांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यात आता एमआयएम देखील मागे नाही. मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रकारे शुभारंभच ओवेसी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
दलितांनंतर मुस्लिम समाज मागास आहेत. मुस्लिम समाज हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे. मुस्लिमांचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण उच्च न्यायालयाने देखील मान्य केले आहे. यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे असे इम्तियाज जलील म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम आरक्षणासाठी तरुण तिरंगा रॅलीत सहभागी होणार आहे अशी माहिती जलील यांनी यावेळी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.