शिवसेनेकडून महागाई आणि मोदी सरकारचा निषेध

सततच्या दरवाढी विरोधात शिवसेनेने (Shiv Sena) आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शिवसेनेने दरवाढी बाबत सायकल रॅली
शिवसेनेने दरवाढी बाबत सायकल रॅली Dainik Gomantak

रायगड: इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस (Congress) सरकारचा प्रचार आणि जाहिरातबाजी करत भाजप (BJP) सरकार सत्तेत आले आहे. परंतु आता केंद्रात भाजपची सत्ता आहे. भाजप सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून महागाईने सर्व रेकॉर्ड पार केले आहेत. पेट्रोलने तर शंभरी पार केली. याचा परिणाम हा सर्वसामान्य नागरीकांना आता असह्य झाला आहे.

या सततच्या दरवाढी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने दरवाढी बाबत राज्यव्यापी सायकल रॅली आंदोलनाचा पुकारा केला. रायगडमध्ये (Raigad) शिवसैनिकांना ठिकठिकाणी रायकल रॅली काढुन इंधन दरवाढ आणि मोदी सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

शिवसेनेने दरवाढी बाबत सायकल रॅली
सावंतवाडी येथे दोन वृद्ध महिलांची हत्या

महाड येथे युवा सेनेतर्फे शहरात सायकल रॅली काढली. शहरातील सर्व भागात युवा शिवसैनिकानी रॅली काढत इंधन दरवाढी (Fuel price increase) बाबत केंद्र सरकारचा निषेध केला. या यावेळी मोठ्या संख्येने युवा शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com