आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांना क्रूझ ड्रग्जच्या तपासातून हटविण्यात आले. आर्यन खान प्रकरण आणि इतर केसेसमधून मला मुक्त करावे अशी मागणी वानखेडे यांनी केली होती.
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. विशेष म्हणजे आर्यन खान खटल्यातील एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर सैल याने त्याच्या रेकॉर्डवर आणि केसेस हाताळण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. गेल्या आठवड्यात टीकेची झोड उठत असताना, एनसीबीने "निर्दोष सेवा रेकॉर्ड" चे कारण देत वरिष्ठ अधिकाऱ्याचे जाहीरपणे समर्थन केले होते. यासोबतच एजन्सीने उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत तपासही सुरु केला.
काय म्हणाले समीर वानखेडे
याप्रकरणी समीर वानखेडे म्हणाले की, “मला तपासातून काढून टाकण्यात आलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी माझी न्यायालयात रीट याचिका होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करणार आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीममध्ये हा समन्वय आहे. मी दिल्लीशी संलग्न नाही.
ते पुढे म्हणाले, “या निर्णयानंतर दिल्ली एनसीबीची एक टीम शनिवारी मुंबईत येत आहे. आता आर्यन खान प्रकरणासह मुंबई विभागातील 6 प्रकरणे आणि इतर 5 प्रकरणे त्यांच्याकडून तपासली जाणार आहेत. ड्रग्जच्या विरोधात मी माझे ऑपरेशन सुरुच ठेवणार. या प्रकरणातून माघार घेण्याचा माझा आदेश उद्या येईल."
नवाब मलिकांनी आनंद व्यक्त केला
त्याचवेळी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधणारे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, "समीर वानखेडेला आर्यन खानसह पाच प्रकरणांमधून काढून टाकण्यात आले आहे. जवळपास 26 प्रकरणे आहेत ज्याची चौकशी आवश्यक आहे. ही फक्त सुरुवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करायचे आहे आणि आम्ही ते करु.”
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर समीर वानखेडे सतत वादाच्या केंद्रस्थानी असतात आणि विशेष म्हणजे आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर सेलने त्यांच्या नोंदी आणि खटले हाताळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.