Sanjay Kumar Singh Dainik Gomantak
महाराष्ट्र

Aryan Khan Case: समीर वानखेडेंच्या जागी नियुक्त केलेले संजय कुमार सिंग नेमके कोण?

समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांचे पथक यापूर्वी ज्या प्रकरणांचा तपास करत होते त्या सर्व प्रकरणांचा तपासही संजय कुमार सिंग (Sanjay Kumar Singh) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी या सर्व प्रकरणांचा तपास एनसीबीचा तरुण अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून आर्यन खानसह 6 प्रकरणांचा काढून घेण्यात आला असून, आता या सर्व प्रकरणांचा तपास वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय कुमार सिंग (Sanjay Kumar Singh) यांच्याकडे सोपवला.

समीर वानखडे यांच्याकडून काढून घेण्यात आलेल्या त्या 6 प्रकणांचा तपास सोपविण्यात आलेले आयपीएस संजय कुमार सिंग कोण आहेत? आर्यन खान ड्रग प्रकरणापासून इतर सर्व प्रसिद्ध प्रकरणांचा तपास त्यांच्याकडे का देण्यात आला आहे ? संजय कुमार सिंग हे 1996 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील ओडिशा केडरचे वरिष्ठ अधिकारी आहेत. संजय सिंग यांना ओडिशा पोलिसांकडून एनसीबीमध्ये बोलावण्यात आले.

या वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये (जानेवारी 2021), त्यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये उपसंचालक (जनरल) म्हणून नियुक्ती केली होती. याआधी ते ओडिशा राज्य पोलिसात तैनात होते. जेव्हा त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले, तेव्हा त्यांची भुवनेश्वरमध्ये अतिरिक्त पोलीस आधुनिकीकरण महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

त्यावेळी आयपीएस संजय कुमार सिंग यांना ओडिशा सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर बढती दिली होती. परंतुनंतर त्यांना केंद्र सरकारच्या वतीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बोलावण्यात आले. ओडिशा केडरचा हे दबंग आयपीएस अधिकारी राज्य पोलिसांमध्ये ड्रग्ज माफियांचा सर्वात मोठा कायदेशीर शत्रू म्हणून ओळखला जातो. संजय कुमार सिंग यांनी ओडिशा राज्य पोलिसात ड्रग टास्क फोर्स प्रमुख म्हणून पदावर असताना केलेली अनेक कामे आजही लक्षात आहेत.

निष्कलंक होते म्हणून कोणी विरोध नाही

ट्विन सिटी आयुक्तालय पोलिसात पदावर असताना त्यांनी ड्रग माफियांविरुद्ध केलेल्या जलद कारवाईचे उदाहरण ओडिशा पोलिसात अजूनही नोंदवले जाते. सध्या असे दबंग आयपीएस अधिकारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑपरेशन्स म्हणून तैनात आहेत. संजय सिंग यांच्या ओडिशा केडरमधील सर्व पदांवर पोस्टिंग असतानाही त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यामुळे त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रतिनियुक्तीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुख्यालयात महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसारख्या संवेदनशील विभागात प्रतिनियुक्तीवर कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करायची याबाबत चर्चा आणि वाद होत असतो. पण 2020 च्या अखेरीस, जेव्हा मंत्रिमंडळ ACC च्या केंद्रीय नियुक्ती समितीने संजय कुमार सिंग यांना ओडिशा पोलिसांतून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुख्यालयात प्रतिनियुक्ती मंजूर केली, तेव्हा कोणतीही चर्चा किंवा वाद झाला नाही. संजय कुमार सिंग यांची 31 जानेवारी 2025 पर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएस संजय सिंह अचानक आले चर्चेत

प्रतिनियुक्तीवर कोणत्याही चर्चेत नसलेले संजय कुमार सिंग यांचे नाव शुक्रवारी (5 नोव्हेंबर 2021 ला अचानक चर्चेत आले. तेही शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सोपवल्यामुळे. उल्लेखनीयबाब म्हणजे 2 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईहून गोव्याला जात असलेल्या क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात समोर आले तेव्हा मुंबई झोन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने सांगितले की आरोपीच्या (आर्यन खान) ताब्यातून एकही ड्रग जप्त करण्यात आले नाही. तसेच तो अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचेही आढळून आलेले नाही.

मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथक या गोंधळात अडकले. हा गोंधळ इतका वाढला की आर्यन खानला अटक करणाऱ्या टीमचा प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरही वैयक्तिक आरोप करण्यात आले. त्यामुळे आर्यन खान ड्रग प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये किंवा बदनाम होऊ नये. त्यामुळे शुक्रवारी समीर वानखेडे यांना या प्रकरणाच्या तपासातून दूर करण्यात आले आणि पुढील तपास संजयकुमार सिंग यांच्याकडे सोपवण्यात आला. समीर वानखेडे आणि त्यांचे पथक यापूर्वी ज्या प्रकरणांचा तपास करत होते त्या सर्व प्रकरणांचा तपासही संजय कुमार सिंग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT