Aryan Khan Dainik Gomantak
महाराष्ट्र

Aryan Khan Case: NCB ने मुख्य तपास अधिकारी अन् गुप्तचर अधिकाऱ्याला केलं सस्पेंड

एनसीबीने मुख्य तपास अधिकारी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांला निलंबित केले आहे.

दैनिक गोमन्तक

Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन प्रकरणाशी संबंधित मुख्य तपास अधिकारी, अधीक्षक व्हीव्ही सिंह आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. कामात हलगर्जीपणा आणि अनियमितता झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीने आर्यन खानसह (Aryan Khan) अन्य 19 जणांना आरोपी केले होते. आर्यनला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या किनारी भागात एका क्रूझ जहाजातून अटक केली होती. मात्र, नंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्याची जामिनावर सुटका केली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्यनला जामीन देण्याचे आदेश जारी करताना उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये हातमिळवणी केली असल्याचे म्हटले होते. मात्र यामध्ये कोणताही कटाचा पुरावा नाही. त्यांच्यात व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

तसेच, "केवळ आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा एकाच क्रूझमधून प्रवास करत असल्याने, हेच त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप होण्याचे कारण असू शकत नाही," असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT