Sanjay Raut News Dainik Gomantak
महाराष्ट्र

संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी

दैनिक गोमन्तक

शिवेसेना नेते संजय राऊत यांना मोठा झटका देणारा निर्णय शिवडी कोर्टाने दिला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केलं आहे. मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानने शौचालय बांधण्याचं कंत्राट घेतले होते. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या प्रकरणात न्यायालयाने हे वॉरंट बजावलं आहे. (Arrest warrant issued against sanjay raut by sewree court complaint filed by Medha kirit somaiya)

मिळालेल्या माहितीनूसार मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते. त्यापैकी 16 शौचालये बांधण्याचं कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाल्याचा दावा राऊत यांनी केला होता. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता.

यावरुन किरीट सोम्मया मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर शिवडी कोर्टाकडून राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. पण राऊत कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपत्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT