'धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही': उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. वास्तविक, नवी मुंबईतील शिवसेनेच्या 32 नगरसेवकांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. यापूर्वी, ठाणे महापालिकेतील ( TMC) पक्षाच्या 67 माजी नगरसेवकांपैकी 66 जणांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला पाठिंबा दर्शविला आहे. यावरुन येत्या काळात बीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरे गटालाही धक्का बसण्याची शक्यता आहे. यातच आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी माध्यमाशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी अनेक मुद्यांचा कानोसा घेतला. गेल्या काही दिवसांपासून उध्दव ठाकरे थेट शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. (Maharashtra Politics)

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'एक ते दोन दिवसांवर आषाढी वारी येऊन ठेपली आहे. वारकरी विठू माऊलीचे दर्शन घेणार आहेत. काही लोक विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आतुर झाले आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून मी शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. परंतु मी कोणत्याही दडपणाशिवाय शिवसैनिकांशी हा संवाद साधत आहे.'

Uddhav Thackeray
राजकीय चक्रव्यूहात अडकले मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरे', तिहेरी हल्ल्यामुळे अडचणी वाढल्या

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, ''शिवसैनिकांना दडपण येईल असं मी कधीही बोलणार नाही. काही दिवसांपासून शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु झाली आहे. परंतु मी तुम्हाला ठासून सांगतो की, धनुष्यबाण चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. दुसरीकडे, शिवसेनेतील (Shiv Sena) अनेक नगरसेवक शिवसेना सोडून गेले आहेत, अशी चर्चा उठली आहे. मात्र शिंदे गटाचे जे समर्थक होते ते आम्हाला सोडून गेले आहेत. मात्र सामान्य शिवसैनिक अजूनही मला भेटायला येत आहेत.''

Uddhav Thackeray
विधानसभा विसर्जित केली जाणार का ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर

'शिवसेनेने साध्या-साध्या माणसांना मोठं केलं आहे. मात्र आता लोकांना प्रश्न पडत आहे की, शिवसेना नेमकी कोणाची? मी तुम्हाला ठासून सांगतो की, शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांची आहे. धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेपासून कोणाही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्या कोणत्याही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. त्याचबरोबर माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. 12 जुलैला जो काही सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) निकाल देईल तो सर्वांना मान्य असेल. मात्र या निकालावरुन खऱ्या अर्थाने देशात किती प्रमाणात लोकशाही ठिकून राहीली आहे हे ही सिध्द होईल,' असेही उध्दव ठाकरे पुढे म्हणाले.

ठाणे महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला

विशेष म्हणजे, 131 सदस्यांच्या ठाणे महापालिकेचा कार्यकाळ काही काळापूर्वी संपला असून आता निवडणुका होणार आहेत. ही महापालिका शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जाते. शिंदे यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी महापौर नरेश महास्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 66 माजी नगरसेवकांनी बुधवारी रात्री शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील ‘नंदनवन’ बंगल्यावर भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

Uddhav Thackeray
Shivsena: नव्या पक्ष चिन्हाची तयारी ठेवा! उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेत फूट

एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात शिवसेनेविरोधात बंडखोरी केली होती. त्यांच्यासोबतच शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनीही पक्षाविरोधात बंड केले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळले. शिवसेनेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे MVA मध्ये इतर घटक होते. शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com