Bird Flu  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे 100 कोंबड्यांचा मृत्यू

येत्या काही दिवसांत बाधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरच्या क्षेत्रात येणारे सुमारे 25,000 पक्षी मारले जातील.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असेल्या वेहोली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये (Poultry Farm) सुमारे 100 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी राजेश जे. नार्वेकर यांनी बर्ड फ्लूचा (Bird flu) धोका लक्षात घेऊन त्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. जिल्हा पशुसंवर्धन विभागाला संसर्ग नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना जिल्हाधिकारी राजेश जे. नार्वेकर म्हणाले की, येत्या काही दिवसांत बाधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरच्या क्षेत्रात येणारे सुमारे 25,000 पक्षी मारले जातील. जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येईल.

हा संसर्ग इतर पक्ष्यांमध्ये पसरू नये यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाला येथील बर्ड फ्लूच्या प्रकरणांची माहिती देण्यात आसल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांत 300 हून अधिक कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण

विशेष म्हणजे ठाण्यातील शहापूर तालुक्यातील वेहोळी येथे गेल्या काही दिवसांत तीनशेहून अधिक कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. हे पाहता पशुसंवर्धन विभागाने तातडीने एक किलोमीटरच्या परिघात किमान 15 हजार पक्षी नष्ट करण्याची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. वेहोळी येथील एका सोसायटीच्या शेडमध्ये देशी कोंबडी आणि बदके अचानक मरण पावली. माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील रोग अन्वेषण विभागाकडे 11 फेब्रुवारी रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवालात बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आली आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे

गुरुवारी 70 जणांचे पथक वहाणी येथील मुक्तजीवन सोसायटीत पोहोचले होते. दरम्यान, मुक्तजीवन सोसायटीच्या शेडमधील सर्व कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर शेजारच्या शेडमध्ये किमान 100 कोंबड्या आणि काही बदके सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटरच्या परिघात असलेल्या कुक्कुटपालनातून पक्षी तसेच चारा आणि अंडी नष्ट करण्याची शास्त्रोक्त मोहीम सुरू केली आहे. बाधित क्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघात चिकन विक्रेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन व्यवहार बंद करण्याचे आदेशही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. असे असताना अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT