VIDEO: हे वेड धोक्याचं! महिला गाडी चालवताना पाहतेय वेबसिरीज

फावल्या वेळेत किंवा वेळ काढून वेबसीरीज पाहणाऱ्यांच प्रमाण खूप कमी आहे.
web series
web seriesDainik Gomantak
Published on
Updated on

गोरोगाव: हल्ली जिकडे तिकडे वेबसीरीजची क्रेज दिसून येते. मित्र मंडळ भेटले तरी त्याच्याच वेब सिरीजची चर्चा रंगते. त्यातच हल्ली बहुचर्चित असलेली शार्क टँक इंडिया (Shark Tank India) ही वेबसीरी लोकांना पसंत येत आहे. पण एवढ्या बिझी लाइफस्टाइलमध्ये घरगृहीणींना किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांना (Women) या सिरीज बघायला वेळ मिळत नाही. फावल्या वेळेत किंवा वेळ काढून वेबसीरीज पाहणाऱ्यांच प्रमाण खूप कमी आहे. मात्र, गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. या महिलेने वेब सिरिज पाहण्याचा एक वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. एक महिला महामार्गावरुन दुचाकी चालवाताना वेबसीरीज (Web Series) पाहत होती.

या विडीयोमध्ये (Video Viral) एक महिला चक्क स्कूटी चालवतांना दिसत आहे. आणि ती महिला शार्क टँक इंडिया ही वेबसीरीज बघत आहे. ही महिला कोण आहे हे जरी माहित नसले तरी तिच्या या नव्या कल्पनेचं धाडस या व्हिडिओमध्ये बघाला मिळते आहे. ती जे करत होती ते अतिशय धोकादायक होते. जिथे शासनाने वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे प्रतीबंधीत केले आहे तीथे ही महिला चक्क वेबसीरीज बघत दुचाकी चालवत आहे. तिच्या या कृत्यामुळे अनेक अनर्थ घडू शकतात. वाहनांच्या अपघाताच्या बातम्या सतत येत असतात, तरीही लोकं सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. मुंबई पोलिसांची नजर चूकवून ही महिला वेबसिरीज बघत असल्याचा हा ह्विडोओ एका युजरने शेअर केला असून त्याने मुंबई पोलिसांना टॅग केला आहे. नागरिकांचा असा निष्काळजीपणा वाढत्या अपघातांच प्रमुख कारण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com