Border Dispute Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात अमित शहांची मध्यस्थी..

अमित शहा यांनी संवेदनशीलपणे हा मुद्दा समजून घेतला. ते 14 डिसेंबरला महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भेटीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबत माहिती दिली.

समन्वयाने तोडगा काढावा

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवर बोलणे झाले. मात्र, केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर बोलून समन्वयाने या वादावर तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केली. अमित शहा यांनी संवेदनशीलपणे हा मुद्दा समजून घेतला. ते 14 डिसेंबरला महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

मराठी भाषिकांवर अन्याय

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सीमाभागातील नागरिक 1956 पासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्नाटक सरकारकडून त्यांच्यावर अत्याचाराचा वरंवटा फिरवला जात आहे. आताही सीमाभागातील नागरिकांवर अत्याचार केला जात आहे. हे सर्व गृहमंत्री अमित शहा यांनी समजून घेतले आहे. ते लवकरच या वादावर तोडगा काढतील , असा विश्वास आहे.

लोकसभाध्यक्षांकडे तक्रार

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या अवमानजनक वक्तव्याबाबत संसदेत खासदार डॉ. अमोल कोल्हे मुद्दा मांडत असतानाच त्यांचा माईक बंद पडला. याबाबत आपण लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मी बोलत असतानाच माईक बंद पडला व त्यानंतर लगेच सदन स्थगित करण्यात आले, हा प्रकार अख्ख्या देशाने पाहिला आहे. याबाबत मी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT