Amol Kolhe: गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जून्या काळाचे आदर्श होते असे वक्तव्य केले होते ,तेव्हापासून या वादाला तोंड फुटले आहे.
त्यानंतर प्रसाद लाड यांनी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि रायगडावर त्यांना प्रशिक्षण देण्यात आले,असे वक्तव्य केले. अशा वक्तव्यांना उदयनराजे भोसले,अमोल कोल्हे ,संजय राऊत ( Sanjay Raut ) यासारख्या अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे संसदेत बोलत असतानाच त्यांचा माईक बंद करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत नसले तरीही ते दैवतासमान आहेत. पुढे ते बोलत असतानाच त्यांचा माईक बंद करण्यात आला.
या प्रकरणावर अमोल कोल्हेंनी संताप व्यक्त केला आहे. माईक बंद कराल आवाज नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी होणाऱ्या व्यक्तव्यांना कायमचा आळा बसावा यासाठी कायद्यातच तरतूद व्हावी फक्त एवढीच मागणी होती. अशी मागणी संविधानिक मागणी आहे आणि संविधानिक मागणीच ऐकून घेतली जाणार नसेल तर नेमंक मनात काय चालल आहे हा प्रश्न आहे ,असंही अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.