रत्नागिरी: कोकणावर सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज (दि.१८ ऑगस्ट) पुन्हा एकदा रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दरड कोसळली. दख्खनजवळ झालेल्या या घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सध्या पाच यंत्रांच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्हा अक्षरशः ठप्प झाला आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कटाई केलेल्या डोंगरकड्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
सतत डोंगराचा भाग कोसळत असल्याने प्रवासी आणि वाहनचालक धास्तावले आहेत. त्यातच वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काम सुरू असताना ठेकेदारांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याचा आरोप स्थानिकांकडून होत असून, त्याचा फटका सरळसोट वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे.
याआधी १५ ऑगस्ट रोजीही या महामार्गावर दरड कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांत दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कोकणात प्रवास करणाऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.